ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध, वाच्यता न करण्यासाठी लाखो रुपये!

पण ही बाब सार्वजनिक न करण्यासाठी निवडणुकीच्या एक महिना आधी ट्रम्प आणि क्लिफोर्ड यांच्यात करार झाला.

ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध, वाच्यता न करण्यासाठी लाखो रुपये!

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एका वादात अडकले आहेत. ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब समोर आली आहे. याची वाच्यता करु नये यासाठी पॉर्न स्टारला लाखो रुपये दिल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त प्रकाशित केलं आहे.

वृत्तानुसार, 2006 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि स्टेफनी क्लिफोर्ड यांची एका गोल्फ सामन्याच्या वेळी भेट झाली होती. स्टॉर्मी डॅनियल्स नावाने ती अडल्ड सिनेमे करते. यानंतर दोघे कथितरित्या रिलेशनशिपमध्ये होते. महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रॅम्प यांचं लग्न वर्षभरापूर्वीच झालं होतं.

शांत राहण्यासाठी क्लिफोर्डला 1.30 लाख डॉलर (सुमारे 82.69 लाख रुपये) देण्यात आले होते. खरंतर अध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेक महिलांनी असे आरोप केले आहेत. आता पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याच्या वृत्ताने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

'वॉल स्‍ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, क्लिफोर्ड 2016 मध्ये एबीसी न्‍यूज चॅनलसोबत ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांबाबत बोलण्यासाठी तयार झाली होती. पण ही बाब सार्वजनिक न करण्यासाठी निवडणुकीच्या एक महिना आधी ट्रम्प आणि क्लिफोर्ड यांच्यात करार झाला. ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांना क्लिफोर्डचे वकील कीथ डेविडसन यांच्या माध्यमातून हे प्रकरण दडपून ठेवण्यात यश आलं.

दुसरीकडे या मुद्द्यावर अशाप्रकारचं कोणतंही काम केलं नाही, असा दावा ट्रम्प यांचे वकील कोहेन यांनी केला आहे. तसंच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित संबंधांचा पॉर्न स्टार क्लिफोर्डने इन्कार केला होता. तसंच ही बाब सार्वजनिक न करण्यासाठी पैसे घेतल्याचा दावाही फेटाळला.

हे वृत्त समोर आल्यानंतर व्हाईट हाऊसला शुक्रवारी (12 जानेवारी) याबाबत परिपत्रक जारी करावं लागलं. हे वृत्त जुनं आणि रिसायकल्ड आहे. निवडणुकीआधी हे वृत्त प्रकाशित झालं होतं, जे फेळाळलं होतं, असं या परिपत्रकात म्हटलं होतं.

तर क्लिफोर्डच्या वकिलांनी 'वॉल स्‍ट्रीट जर्नल'वर एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून चुकीच्या बातम्या प्रकाशित केल्याचा आरोप आहे. 'वॉल स्‍ट्रीट जर्नल'ने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी 2016 मध्येही एक वृत्त प्रकाशित केलं होतं. यामध्ये अमेरिकन मॉडल कॅरेन मॅकडॉगलसोबतचे संबंध लपवण्यासाठी 1.50 लाख डॉलर (95.41 लाख रुपये) देण्याचं म्हटलं होतं. ट्रम्प यांचे मॅकडॉगलसोबत एका दशकापूर्वी कथित संबंध होते.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Donald Trump Lawyer Paid $130,000 to cover up porn star affair with president : Report
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV