...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे. तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

By: | Last Updated: > Sunday, 13 August 2017 8:51 AM
Donald Trump warns of military coup against North Korea

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे. तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांनी न्यूजर्सीच्या बेडमिंस्टरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर कोरियाला इशारा दिला. ट्रम्प म्हणाले की, ”सध्या त्यांच्याकडून (किम जोंग) जाहीर धमक्या देण्याचं काम सुरु आहे. या धमक्यासोबत ते गुआम किंवा अमेरिकेच्या सहकारी देशांवर चढाई करण्याचा प्रयत्न करतील, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.”

दुसरीकडे ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही किंम जोंग यांना इशारा दिला आहे. ”उत्तर कोरिया जर मूर्खपणाच्या कृती करेल, तर अण्वस्त्र संपन्न देश त्यांच्याविरोधात लष्करी बळ वापरण्यास मागे पुढे पाहणार नाही.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र परिक्षणचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यातच उत्तर कोरियाकडून अमेरिकेला सातत्यानं धमक्या देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांनी, आपली अण्वस्त्रे अमेरिकेच्या टप्प्यात असल्याची उघड धमकीच दिली होती. यानंतर अमेरिका आणि उत्तर कोरियाकडून सातत्यानं वक्तव्यं सुरु आहेत.

दुसरीकडे युद्धाच्या शक्यतेमुळे उत्तर कोरियातील तब्बल 35 लाख लोकांनी सैन्यात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे, वृत्त तेथील सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. उत्तर कोरियातील लष्करात सध्या सव्वा लाख जवान असून, पावणे आठ लाख लोकांचे राखीव दलही त्या देशाकडे आहे.

मात्र, उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांच्या आधारे युद्धाची भाषा देण्यात असल्याने एवढ्या मोठ्या सैन्याची गरज काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Donald Trump warns of military coup against North Korea
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'जन गण मन' गाऊन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं अनोखं रिटर्न गिफ्ट
'जन गण मन' गाऊन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं अनोखं रिटर्न गिफ्ट

लाहोर : भारत आणि पाकिस्तानमधला तणाव एकीकडे वाढताना दिसत आहे, मात्र

स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू
स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू

टुर्कु (फिनलँड) : फिनलँडच्या टुर्कु शहरात एका व्यक्तीने अनेक

यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह
यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह

लंडन : एकीकडे भारतासह जगभरात अनेक ठिकाणी समलैंगिक संबंधांना आक्षेप

Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार
Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार

बार्सिलोना: स्पेनमधील बार्सिलोना शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला.

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य...

दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन

भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश
भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश

भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू
भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू

लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी