कानाला लावलेल्या हेडफोनचा स्फोट, महिलेचा चेहरा भाजला

कानाला लावलेल्या हेडफोनचा स्फोट, महिलेचा चेहरा भाजला

बीजिंग : विमानात प्रवास करताना हेडफोन लावणं महिलेला चांगलंच महागात पडलं. कानाला लावलेला हेडफोनचा स्फोट झाल्याने महिलेचा चेहरा भाजला. बीजिंगहून मेलबर्नला जाणाऱ्या विमानातील ही घटना आहे.

महिलेने बॅटर संचलित हेडफोन कानाला लावलेले होते. या हेडफोनचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी महिलेवर प्रथोमपचार केले, अशी माहिती आहे.

https://twitter.com/HuffingtonPost/status/842012818010431488

प्रवाशांनी बॅटरी संचलित उपकरणांपासून विमान प्रवासात सावध रहावं, असं आवाहन या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलं आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: burn earphone स्फोट हेडफोन
First Published:
LiveTV