इंग्रजी साहित्यिक खजुओ इशिगुरुओ यांना साहित्याचा नोबेल

‘द रिमेन्स ऑफ द डे’ या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक आहेत.

By: | Last Updated: > Thursday, 5 October 2017 5:57 PM
English Writer Kazuo Ishiguro wins the Nobel prize for literature latest updates

स्वीडन : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक खजुओ इशिगुरुओ यांना यंदाचा साहित्याचा नोबेल जाहीर झाला आहे. ‘द रिमेन्स ऑफ द डे’ या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक आहेत.

आठवणी, काळ या गोष्टींवर आधारित त्यांचं बहुतांश लेखन आहे. त्यांनी एकूण 8 पुस्तकं लिहिली. शिवाय, सिनेमा आणि टेलिव्हिजनसाठी पटकथा लेखनही केलं.

‘द रिमेन्स ऑफ द डे’ ही कादंबरी वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. सर्वाधिक वाचली गेलेली ही त्यांची कादंबरी 1989 प्रसिद्ध झाली.

इशिगुरुओ यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1954 रोजी जपानमधील नागासाकीत झाला. 1960 साली त्यांचं संपूर्ण कुटुंब ब्रिटनला स्थलांतरित झालं. त्यांना 1982 रोजी ब्रिटीश नागरिकत्व मिळालं.

1974 साली त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये उच्च शिक्षणास सुरुवात केली. इंग्रजी आणि तत्त्वज्ञान 1978 साली ते बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) पदवी मिळवली. त्यानंतर यूनिव्हर्सिटी ऑफ इस्ट अँग्लियामधून सृजनशील लेखनात त्यांनी एमए पूर्ण केलं.

खजुओ इशिगुरुओ यांच्या कादंबऱ्या :

  • अ पेले व्ह्यू ऑफ हिल्स (1982)
  • अॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड (1986)
  • द रिमेन्स ऑफ द डे (1989)
  • द अनकन्सोल्ड (1995)
  • व्हेन वी वेअर ऑर्फन्स (2000)
  • नेव्हर लेट मी गो (2005)
  • द ब्युरिड जायंट (2015)

1989 साली ‘द रिमन्स ऑफ द डे’साठी बुकर प्राईजनेही त्यांचा गौरव झाला आहे. तर 2005 साली जगप्रसिद्ध ‘टाईम’ मॅगझिनने ‘नेव्हर लेट मी गो’साठी सर्वोत्कृष्ट 100 इंग्रजीलेखकांमध्येही त्यांना स्थान दिलं होतं. शिवाय, 2008 साली ‘द टाईम्स’ने इशिगुरुओ यांची 1945 पासूनच्या सर्वोत्कृष्ट 50 ब्रिटीश लेखकांच्या यादीत निवड केली होती.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:English Writer Kazuo Ishiguro wins the Nobel prize for literature latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला
काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री

26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका
26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

लाहोर : दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या पाकिस्तानी पत्रकार

ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा
ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

ओमान : ओमानमध्ये 61 व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित

पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या
पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या

वलेत्ता : पनामा पेपर्समधून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करुन जगाला

जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना
जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना

लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर

सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी
सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील

कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात
कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत

'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या
'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या

वॉशिंग्टन : जगभरात मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून

अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश
अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश

अबुधाबी : अबुधाबीमध्ये आयोजित एका मेगा लकी ड्रॉमध्ये दहा जणांना

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

स्टॉकहोम (स्वीडन): यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे