'फोर्ब्ज'च्या युवा भारतीयांच्या यादीत बुमरा, मिथिला पालकर

यशाचा प्रभाव, दीर्घ काळापर्यंत आपापल्या क्षेत्रात टिकून राहण्याची क्षमता यासारख्या निकषांवर 30 युवा भारतीयांची निवड करण्यात आली आहे.

'फोर्ब्ज'च्या युवा भारतीयांच्या यादीत बुमरा, मिथिला पालकर

न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने 'फोर्ब्ज इंडिया 30 अंडर 30' म्हणजे तीस वर्षांखालील 30 भारतीयांची यादी जाहीर केली आहे. क्रीडा, मनोरंजन, संगीत, उद्योग अशा विविध क्षेत्रातील तरुणांचा यात समावेश आहे. क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा, अभिनेत्री मिथिला पालकर, भूमी पेडणेकर यांना या यादीत स्थान मिळालं आहे.

पिस्तुल शूटर हीना सिद्धू, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा, हॉकी गोलकीपर सविता पुनिया, महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर या क्रीडापटूंचा फोर्ब्जच्या यादीत समावेश आहे.

कप साँगमुळे घराघरात पोहचलेली 'गर्ल इन द सिटी' आणि 'मुरांबा' फेम मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर, 'दम लगा के हैशा' आणि 'शुभमंगल सावधान' फेम अभिनेत्री भूमी पेडणेकर, 'मसान' फेम अभिनेता विकी कौशल हे मनोरंजन विश्वातले तारे आहेत.

'ओके जानू'तील हम्मा साँग फेम गायक जुबिन नौतियालही यादीत झळकला आहे. यशाचा प्रभाव, दीर्घ काळापर्यंत आपापल्या क्षेत्रात टिकून राहण्याची क्षमता यासारख्या निकषांवर 30 युवा भारतीयांची निवड करण्यात आली आहे.

संपूर्ण यादीसाठी क्लिक करा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Forbes India Under-30 list : Jasprit Bumrah, Harmanpreet Kaur, Mithila Palkar, Bhumi Pednekar named latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV