'हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी'

मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या खात्म्यासाठी अनेक परदेशी यंत्रणांनी कंबर कसल्याची माहिती आहे. परदेशी यंत्रणांनी हाफिजच्या खात्यासाठी आठ कोटीची सुपारी दिली असल्याचा दावा पाकिस्ता दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे.

'हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी'

इस्लामाबाद : मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या खात्म्यासाठी अनेक परदेशी यंत्रणांनी कंबर कसल्याची माहिती आहे. परदेशी यंत्रणांनी हाफिजच्या खात्यासाठी आठ कोटीची सुपारी दिली असल्याचा दावा पाकिस्ता दहशतवाद विरोधी पथकाने केला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानच्या सुरक्षा खात्याला हाफिज सईदच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यात हाफिज सईदच्या खात्म्यासाठी एका आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं 8 कोटी रुपये दिले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यापासून जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. तर अमेरिकेनं हाफिज सईदला 2014 सालीचं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं.

हाफिजला संपूर्ण जगानं दहशतवादी ठरवलं असलं, तरी पाकिस्तान अद्याप हाफिज सईद दहशतवादी असल्याचं मान्य करायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन सातत्याने पाकिस्तानने हाफिज सईदचा बचाव केला आहे.

मुंबई हल्ल्याप्रकरणीही भारताने सातत्याने हाफिज सईदला ताब्यात देण्याची  पाकिस्तानकडे मागणी केली आहे. पण पाकिस्तानकडून ही मागणी अमान्य करण्यात आली आहे.

दुसरीकडे एक हजारपेक्षा जास्त मुस्लीम धर्मगुरुंनी हाफिज सईदवर कारवाईची मागणी केली आहे. या मुस्लीम  धर्मगुरुंनी थेट संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून हाफिज सईदच्या भारतविरोधात कारवायांप्रकरणी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: foreign spy agency planning to kill hafiz saeed says pakistan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV