पाकिस्तानी तरुणीचे गायत्री मंत्राचे सूर, नवाज शरीफ यांची दाद

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 17 March 2017 12:53 PM
पाकिस्तानी तरुणीचे गायत्री मंत्राचे सूर, नवाज शरीफ यांची दाद

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्रांचं पठण करण्यात आलं. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कराचीमध्ये होळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे.

या कार्यक्रमात नवाज शरीफ प्रमुख पाहुणे होते. यावेळी नरोदा मालिनी नावाच्या तरुणीने गायत्री मंत्राचं पठण केलं. गायत्री मंत्र संपल्यानंतर शरीफ यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. यानतंर शरीफ यांनी हॅप्पी होली म्हणत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली.

नवाज शरीफ म्हणाले की, ‘पंतप्रधान म्हणून सर्व धर्माच्या लोकांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. अल्लाह कोणत्याही शासकाला विचारणार नाही की त्याने कोणत्या एका ठराविक धर्माच्या लोकांसाठी काय केलं? तो माझ्यासारख्या लोकांना विचारेल की, त्याचं हे जग आम्ही कसं सुंदर केलं? एक धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा वरचढ ठरेल यासाठी पाकिस्तानची निर्मिती झालेली नाही. धर्म कोणावरही जबरदस्ती करत नाही. इस्लाममध्ये जबरदस्तीने केलेलं धर्मांतर हा अपराध आहे.’

पाहा व्हिडीओ

First Published: Friday, 17 March 2017 12:52 PM

Related Stories

मोदींचा अमेरिका दौरा, पहिल्यांदाच ट्रम्प आणि मोदी भेटणार
मोदींचा अमेरिका दौरा, पहिल्यांदाच ट्रम्प आणि मोदी भेटणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाअखेर अमेरिका दौऱ्यावर

पाच राज्यातील यशाबद्दल अभिनंदन, ट्रम्प यांचा मोदींना फोन
पाच राज्यातील यशाबद्दल अभिनंदन, ट्रम्प यांचा मोदींना फोन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी!
जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी!

मुंबई : गॉर्जियस, स्टनिंग, फॅशनेबल, कितीही विशेषणं लावली… तरी या

अमेरिकेत नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू
अमेरिकेत नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

सिनसिनाटी (अमेरिका) : अमेरिकेतील ओहिओ प्रांतातल्या सिनसिनाटी शहरात

तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन
तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन

न्यूयॉर्क : अमेरिकेत वर्णभेदातून भारतीयांच्या हत्या आणि धमक्यांचे

भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या
भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या

न्यूजर्सी : मूळ आंध्र प्रदेशातील असलेल्या एका महिला सॉफ्टवेअर

अहमदाबाद-लंडन विमानाला पक्ष्याची धडक, विमानाचंच नुकसान
अहमदाबाद-लंडन विमानाला पक्ष्याची धडक, विमानाचंच नुकसान

लंडन : अहमदाबाद-लंडन ते नेवॉर्क असा प्रवास करणाऱ्या विमानाला एका

भारत दहशतवादाविरोधात इंग्लंडसोबत : पंतप्रधान मोदी
भारत दहशतवादाविरोधात इंग्लंडसोबत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी

लंडन : दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 40 जखमी, हल्लेखोराचाही खात्मा
लंडन : दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 40 जखमी, हल्लेखोराचाही...

लंडन : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात

इंग्लंडच्या संसदेबाहेर पोलिसावर चाकूहल्ला, दोन हल्लेखोर ठार
इंग्लंडच्या संसदेबाहेर पोलिसावर चाकूहल्ला, दोन हल्लेखोर ठार

लंडन: इंग्लंडच्या संसदेवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला. पण यामध्ये