भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Sunday, 19 February 2017 10:34 PM
भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा

प्रातिनिधिक फोटो

मुंबई: मुंबईहून लंडनकडे जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा ATC शी (Air Traffic Control) हवेतच संपर्क तुटल्यानं, जर्मनीच्या एअरफोर्सनं तत्परता दाखवतं विमानाला  दिशा दाखवली. जर्मन एअरफोर्सनं दाखवलेल्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली.

या घटनेचा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना 16 फेब्रुवारीची असून, बोईंग-777 हे विमान मुंबईहून लंडनला चाललं होतं. यावेळी जर्मनीतील कोलोनजवळ विमानाचा ATC शी संपर्क हवेतच तुटला. यावेळी जर्मनी एअरफोर्सच्या दोन विमानांनी हवेत उड्डाण घेऊन, जेट एअरच्या विमानाच्या वैमानिकांसोबत इंटरसेप्ट कॉन्टॅक्ट स्थापन करण्यात यश मिळवलं. यानंतर जेट एअरवेजच्या विमानाचा एटीसीशी संपर्क होईपर्यंत जर्मनीच्या विमानांनी दिशा दाखवली.

जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनीही याबाबतची पुष्टी केली असून, जेट एअरवेजच्या 9W118 या विमानाचा जर्मनीतील लोकल एटीसीशी संपर्क तुटला असल्याचं मान्य केलं. पण हा संपर्क काहीच मिनिटांसाठी तुटला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

दरम्यान, या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जर्मन एअरफोर्सनं दोन विमान तयार ठेवली होती. यानंतर हे विमान 330 प्रवासी आणि 15 क्रू मेंबरसह सुरक्षित लंडनमध्ये उतरलं. पण या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

व्हिडिओ पाहा

First Published: Sunday, 19 February 2017 10:31 PM

Related Stories

11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं
11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं

बँकॉक : थायलंडमधील हादरवून टाकणाऱ्या घटनेने फेसबुक लाईव्हवर

प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर खोटं बोलले, इमानच्या बहिणीचा आरोप
प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर खोटं बोलले, इमानच्या बहिणीचा आरोप

मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या मुंबईतील सैफी

एच 1 बी व्हिसावरुन अमेरिकेची भारतीय कंपन्यांवर नाराजी
एच 1 बी व्हिसावरुन अमेरिकेची भारतीय कंपन्यांवर नाराजी

वॉशिंग्टन : लॉटरी पद्धतीने एच1-बी व्हिसा देताना अतिरिक्त व्हिसा

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला,  भारताकडून तीव्र निषेध
अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला, भारताकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली : दहशतवाद संपवण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या पाठिशी

फ्रान्स राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मॅकरॉन आणि पेन यांच्यासाठी फेर मतदान
फ्रान्स राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मॅकरॉन आणि पेन...

पॅरिस : फ्रान्सच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी

चीन सर्वबाद 28, वन डे क्रिकेटच्या इतिहासात नवा नीचांक
चीन सर्वबाद 28, वन डे क्रिकेटच्या इतिहासात नवा नीचांक

बँकॉक : सौदी अरेबियानं चीनला अवघ्या 28 धावांत गुंडाळून, जागतिक

मिनी बस-ट्रकच्या धडकेनंतर आग, 20 मुलांचा होरपळून मृत्यू
मिनी बस-ट्रकच्या धडकेनंतर आग, 20 मुलांचा होरपळून मृत्यू

प्रेटोरिया : दक्षिण आफ्रिकेत मिनी बस आणि ट्रकच्या धडकेनंतर

चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये फडकला तिरंगा
चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये फडकला तिरंगा

नाशिक : इतिहासात पहिल्यांदाच चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये

VIDEO : विमानतळावर मायलेकीला मारहाण, महिला कॉन्स्टेबल निलंबित
VIDEO : विमानतळावर मायलेकीला मारहाण, महिला कॉन्स्टेबल निलंबित

इस्लामाबाद : विमानतळावर प्रवासी मायलेकीला बेदम मारहाण करणाऱ्या

या क्षणी माझा मूड 'काली माते'सारखा, पॉपस्टार केटी पेरीची पोस्ट
या क्षणी माझा मूड 'काली माते'सारखा, पॉपस्टार केटी पेरीची पोस्ट

मुंबई : हिंदू देवतेचा फोटो पोस्ट करुन पाश्चिमात्य पॉप गायिका केटी