नर्सच सीरिअल किलर, 6 वर्षात 100 रुग्णांचे प्राण घेतले

आरोपी नील्स होगल सध्या दोन हत्यांप्रकरणी आजन्म कारावास भोगत आहे.

नर्सच सीरिअल किलर, 6 वर्षात 100 रुग्णांचे प्राण घेतले

बर्लिन : रुग्णांची सेवासुश्रुषा करण्याची जबाबदारी नर्सवर असते. मात्र जर्मनीतील एक नर्सच सीरिअरल किलर असल्याचं उघड झालं आहे. आरोपी पुरुष रुग्णसेवकाने सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल 100 रुग्णांचे प्राण घेतल्याचा आरोप आहे.

आरोपी नील्स होगल सध्या दोन हत्यांप्रकरणी आजन्म कारावास भोगत आहे. मरणपंथाला लागलेल्या रुग्णांना जीवदान देऊन सहकाऱ्यांवर प्रभाव पाडण्याचा त्याचा इरादा होता. त्यासाठी तो रुग्णांना मुद्दाम डोस देऊन मरणासन्न अवस्थेत टाकत असे. मात्र यात 100 रुग्णांना प्राण गमवावे लागले.

1999 ते 2005 या कालावधीत या हत्या घडल्या आहेत. ओल्डनबर्गमधील रुग्णालयात 38, तर डेल्मेनहॉर्स्टमधील रुग्णालयात 62 रुग्णांनी प्राण गमावले. आरोपीने कदाचित शंभरपेक्षा जास्त रुग्णांनाही मारलं असू शकतं, मात्र त्यापैकी अनेकांचं दफन झाल्यामुळे पुरावे नष्ट झाले आहेत, असं म्हटलं जात आहे.

आरोपी जर सर्व हत्यांप्रकरणी दोषी सिद्ध झाला, तर जर्मनीच्या इतिहासात युद्धोत्तर काळातील हे सर्वात भीषण सीरिअल किलिंग ठरेल.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Germany serial killer : Nurse Niels Hoegel allegedly killed at least 100 patients latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV