जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन', जागतिक बँकेचा दावा

भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात आधिक बळकट होईल, असा दावा जागतिक बँकेने केला आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी हा दावा केला आहे.

By: | Last Updated: > Sunday, 8 October 2017 2:21 PM
gst will bring acche din for indian economy said world bank

वॉशिंग्टन : जीएसटी, नोटाबंदी, महगाई आदी मुद्द्यांमुळे एकीकडे देशभरात मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. पण दुसरीकडे जागतिक बँकेच्या दाव्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात अच्छे दिन येतील, असा दावा जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी केला आहे.

किम म्हणाले की, “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चा भारतीय अर्थव्यवस्थेवर लवकरच सकारात्मक बदल दिसून येईल. जीएसटीसाठी प्राथमिक तयारींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पहिल्या तिमाहित घसरला. पण आगामी काळात जीएसटीचा सकारात्मक बदल दिसून येईल.”

किम पुढे म्हणाले की, “सध्याची घसरण ही तात्पुरती असून, येत्या काही महिन्यात चांगले बदल दिसतील, आणि भारताच्या जीडीपीमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायाला मिळेल. पंतप्रधान मोदी औद्योगिक क्षेत्रात सुधारणा आणण्यासाठी वास्तवदर्शी काम करत असल्याने, त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील.”

दरम्यान, किम यांनी पंतप्रधानांचे कौतुक केलं. पंतप्रधान मोदी सुधारणांसाठी प्रतिबद्ध आहेत. ते भारताची अवस्था सुधारण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. सध्या भारतासमोर अनेक आव्हानं आहेत. आणि इतर देशांप्रमाणेच त्यामध्ये सुधारणांची शक्यताही सर्वाधिक आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पहिल्या तिमहित भारताच्या आर्थिक विकासात घसरण पाहायला मिळाली. एप्रिल ते जून या तिमाहित भारताचा जीडीपी 5.7 टक्के होता. तर जानेवारी ते मार्चदरम्यान हा दर 6.1 टक्के होता. यामुळे विरोधी पक्षांसह अनेक अर्थतज्ज्ञांनीही जीडीपी घसरण्यासाठी नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार असल्याचं म्हटलं.

संबंधित बातम्या

आरबीआयकडून रेपो दरात कोणताही बदल नाही!

यशवंत सिन्हांना 80 व्या वर्षीही पदाची लालसा, नाव न घेता अरुण जेटलींचा टोला

नोटाबंदीनंतर लगेचच जीसएटी का? यशवंत सिन्हांचे हल्ले सुरुच

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:gst will bring acche din for indian economy said world bank
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला
काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री

26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका
26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

लाहोर : दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या पाकिस्तानी पत्रकार

ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा
ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

ओमान : ओमानमध्ये 61 व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित

पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या
पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या

वलेत्ता : पनामा पेपर्समधून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करुन जगाला

जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना
जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना

लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर

सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी
सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील

कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात
कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत

'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या
'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या

वॉशिंग्टन : जगभरात मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून

अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश
अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश

अबुधाबी : अबुधाबीमध्ये आयोजित एका मेगा लकी ड्रॉमध्ये दहा जणांना

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

स्टॉकहोम (स्वीडन): यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे