मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद निवडणूक लढणार

मुंबईतील 26\11 हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानातील 2018 ची निवडणूक लढवणार आहे. हाफिज सईदने यासाठी मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे.

By: | Last Updated: 03 Dec 2017 08:32 AM
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद निवडणूक लढणार

इस्लामाबाद : मुंबईतील 26\11 हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानातील 2018 ची निवडणूक लढवणार आहे. हाफिज सईदने यासाठी मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे.

लाहोरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हाफीजनं निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. हाफिजने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची स्वत: हून घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुसरीकडे हाफिज सईदच्या पक्षाला मान्यता देण्यास पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं नकार दिला आहे. त्यामुळे हाफिज डमी उमेदवार किंवा इतर पक्षांची मदत घेऊन उमेदवार निवडणुकीत उभे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, 26\11 हल्ल्या मागं हाफिज सईद मास्टर माईंड असल्याचे सबळ पुरावे पाकिस्तानला पुरवूनही पाकिस्तान सरकारनं पुरावे दाखल केले नसल्याचा आव आणला आहे.

तर हाफिजची नुकतीच दहा महिन्याच्या नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर, पाकिस्तानातल्या अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. लाहोरमध्ये त्याच्या सुटकेबद्दल पुष्पवृष्टी करण्यात आली.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची स्थापनाही त्यानेच केली आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही त्याचा होत होता. शिवाय तो मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईद भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.

एप्रिल 2012 मध्ये, अमेरिकेने दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांची यादी जारी केली. या यादीत हाफिज सईदचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देण्यासाठी एक कोटी डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर भारताने त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

संबंधित बातम्या

हाफिज सईदला पुन्हा डांबलं, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नमलं

माझं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवा, हाफिज सईदची UN कडे मागणी

हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं

हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

26/11 ला 9 वर्षे पूर्ण, हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट

‘हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी’

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: most terrorist-hafiz-saeed-declares-to-contest-election
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV