हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद आता पाकिस्तानात उजळ माथ्यानं फिरु शकणार आहे. कारण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद आता पाकिस्तानात उजळ माथ्यानं फिरु शकणार आहे. कारण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत हाफिज सईदला जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यानंतर सरकारने हाफिजच्या नजरकैदेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत, त्याची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. गुरुवारी त्याची नजरकैदेतून सुटका होऊ शकते.नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश देताना बोर्डाने सांगितले की, "जर जमात-उद-दावा प्रमुख हाफिज सईदविरोधात कोणत्याहीप्रकरणात आरोपी नसेल, तर त्याची सुटका केली पाहिजे."

'हाफिज सईद दाऊदच्या मदतीनं भारताविरोधात जिहाद पुकारणार'

गेल्याच महिन्यात कोर्टाने त्याची नजरकैद 30 दिवसांनी वाढवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत याच आठवड्यात संपते. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीमध्ये त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले.

हाफिज सईदची नवी संघटना, पाककडून कारवाईचा केवळ फार्स?

31 जानेवारी 2017 पासून हाफिज सईद आणि त्याचे चार साथिदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काझी कासिफ हुसैनला पंजाब सरकारने दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत नजरकैदेत ठेवलं होतं.

हाफिजच्या चार साथिदारांची ऑक्टोबरमध्ये नजरकैदेतून मुक्त करण्यात आलं. पण हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

 

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: hafiz saeed to be freed tomorrow on imprisonment in pakistan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV