पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू

पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू

लिस्बन : मध्य पोर्तुगालमधल्या पेड्रोगन ग्रँड परिसरात लागलेल्या वणव्यात 57 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर किमान 60 जण जखमी झाले आहेत.

आग लागलेल्या परिसरात अनेक प्रवासी कारमध्ये अडकल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती गृहमंत्री जॉर्ज गोम्‍स यांनी दिली आहे.

शनिवारी दुपारी लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांना नियंत्रण मिळवण्यात आलं नाही. अग्निशामक दलाचे जवळपास 500 कर्मचारी आणि 160 वाहनं बचावकार्य करत आहेत.

वणवा उसळलेल्या भागातील तापमान प्रचंड वाढलं असताना वीज कोसळून वणवा भडकल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. मात्र आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV