...तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया

By: | Last Updated: > Monday, 10 July 2017 10:23 AM
If Pakistan will ask third countrys army can enter kashmir, said China media

बीजिंग : चीनच्या सरकारी मीडियाने एका ताज्या लेखात अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली आहे. “पाकिस्तानने विनंती केल्यास काश्मीरमध्ये ‘तिसऱ्या देशाचं’ सैन्य घुसू शकतं,” अशी गरळ चीनी वृत्तपत्राने ओकली आहे.

चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहिलं आहे की, “ज्या प्रकारे भूतानच्या दिशेने सिक्किमच्या डोकलाममध्ये रस्ता बनवण्यापासून भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याला रोखलं, त्याच तर्कावर पाकिस्तानच्या आग्रहानंतर काश्मीरमध्ये ‘तिसऱ्या देशाचं’ सैन्य घुसू शकतं.”

ग्लोबल टाइम्समध्ये चीनच्या वेस्ट नॉर्मल यूनिव्हर्सिटीमधील भारताच्या अध्ययन विभागाचे प्राध्यापक आणि व्यवस्थापक लॉन्ग शिंगचून यांनी लिहिलं आहे की, “जर भूतानने भारताची मदत मागितली आहे, तर ती मदत केवळ निर्धारित सीमेपर्यंत मर्यादित राहायला हवी. भूतानच्या मदतीच्या नावावर भारताने चीनच्या डोकलाम परिसरात घुसखोरी केली आहे.”

या तर्कावर भारत आणि पाकिस्तानमधील वादग्रस्त काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचं सैन्य घुसू शकतं. भारत कायमच आंतरराष्ट्रीय समानता आणि देशांतर्गत प्रकरणात दखल देऊ नये असं बोलत असतो. पण दक्षिण आशियात भारताने चतुराईने वर्चस्व प्रस्थापित केलं आह, जे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन आहे.

सिक्कीममधील भारतीय परिसर डोकाला लागूनच भूतानचा डोकलाम परिसर आहे. भूतानचा डोकलाम हा आपलाच डोंगलांग भाग असल्याचा दावा चीन करत आहे. भारत आणि चीनमध्ये 3488 किलोमीटरची सीमा आहे, तर 220 किलोमीटरची मोठी सीमा सिक्कीममध्ये आहे.

चीनने सह जूनला सिक्कीममधील भारतीय सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. भूतानच्या डोकलाम खोऱ्यात सैन्याचे टँक आणि इतर जड वाहनांच्या दळणवळणासाठी चीनला रस्ता बनवायचा आहे, ज्याला भारत विरोध करत आहे. मागील एक महिन्यापासून सिक्किममधील भारत-चीन सीमेवर तणाव आहे. ज्या परिसरात वाद झाला आहे, तिथे भारत, भूतान आणि तिबेटची सीमा आहेत. रस्ता बनवण्याच्या चीनच्या निर्णयाचा भूतानने अधिकृतरित्या विरोध केला आहे.

सीमेवर झालेल्या वादानंतर भारत आणि चीनने डोकलाम परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं आहे.

मागील काही काळापासून हिंदी महासागर आणि अॅडनच्या आखातात चीनने युद्धनौकांच्या संख्येत वाढ केली आहे. एका अहवालानुसार, हिंदी महासागरात चीनने भारताच्या चौपट युद्धनौका तैनात केल्या आहेत.

तर दुसरीकडे भारत आज (10 जुलै) जपान आणि अमेरिकेसोबत पूर्वनियोजित संयुक्त नौदल अभ्यास करणार आहे.

संबंधित बातम्या

चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी

G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र

चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर

सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा

…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:If Pakistan will ask third countrys army can enter kashmir, said China media
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं
नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं

इस्लामाबाद : नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं

VIDEO : झुलणारा भलामोठा पाळणा कोसळून मृत्यू
VIDEO : झुलणारा भलामोठा पाळणा कोसळून मृत्यू

ओहिओ : अमेरिकेतील ओहिओ शहरात राईड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. सोशल

पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट, 26 जणांचा मृत्यू
पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट, 26 जणांचा मृत्यू

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्फोट झाला आहे. लाहोर शहरातील अरफा

आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती
आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची...

बिजिंग : डोकलाम सीमावादवरून चीनने पुन्हा एकदा भारताला धमकवण्याचा

पाकिस्तानला झटका, अमेरिकेनं दोन हजार कोटींची आर्थिक मदत थांबवली
पाकिस्तानला झटका, अमेरिकेनं दोन हजार कोटींची आर्थिक मदत थांबवली

दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या यादीत नाव आलेल्या

कपड्यांमधून 102 आयफोनची तस्करी, तरुणी अटकेत
कपड्यांमधून 102 आयफोनची तस्करी, तरुणी अटकेत

मुंबई : चीनमध्ये एका तरुणीला 102 आयफोनच्या तस्करीच्या आरोपात अटक

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका

नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश
सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं

रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली : रशियाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7