पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, भारताचा UN मध्ये पलटवार

भारतात काश्मिरीवर अन्याय होतो अशा उलट्या बोंबा ठोकणाऱ्या पाकिस्तानला, भारताने संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन सडेतोड उत्तर दिलं.

पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, भारताचा UN मध्ये पलटवार

नवी दिल्ली: भारतात काश्मिरीवर अन्याय होतो अशा उलट्या बोंबा ठोकणाऱ्या पाकिस्तानला, भारताने संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन सडेतोड उत्तर दिलं.

पाकिस्तान हे ‘टेररिस्तान’ बनलं आहे, असं भारताने ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी काश्मिरींवर भारतात अन्याय होतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप व्हावा अशी मागणी केली होती.

यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी इनाम गंभीर यांनी सडेतोड उत्तर दिलं. गंभीर म्हणाल्या, “लादेनला सुरक्षा, मुल्ला उमरला आसरा देणारा देश स्वत:ला दहशतवाद पीडित राष्ट्र म्हणत आहे. पाकिस्तान आता टेररिस्तान बनलं आहे. पाकिस्तान जगभरात दहशतवादी निर्यात करतं. हाफिज सईदच्या ज्या लष्कर ए तोयबा या संघटनेला संयुक्त राष्ट्राने  दहशतवादी संघटना घोषित केली आहे, ती संघटना पाकिस्तानात निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा जगाने पाहिला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे”

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV