कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो सिटीमधील एका गॅस स्टेशन (पेट्रोल पंप)वर असलेल्या दुकानात ही घटना घडली.

कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. एका भारतीय वंशाच्या नागरिकासह चौघा लुटारुंनी दुकानात गोळीबार केला.

कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो सिटीमधील एका गॅस स्टेशन (पेट्रोल पंप)वर असलेल्या दुकानात ही घटना घडली. 21 वर्षांचा धरमप्रीत सिंग जेसर मंगळवारी रात्री ड्युटीवर होता. त्यावेळी चौघा आरोपींनी दुकानात घुसून लूटमार केली.

घाबरलेला धरमप्रीत कॅश काऊंटरमागे लपला होता. मात्र पैसे आणि वस्तूंची लूट केल्यानंतर पळताना लुटारुंनी त्याच्यावर गोळी झाडली. बुधवारी सकाळी आलेल्या ग्राहकाने धरमप्रीतचा मृतदेह पाहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

मूळ पंजाबचा असलेला धरमप्रीत जेसर स्टुडंट व्हिसावर तीन वर्षांपूर्वी यूएसला गेला होता. अकाऊण्ट्स विषयाचं शिक्षण तो घेत होता.

पोलिसांनी मुख्य संशयित असलेल्या भारतीय वंशाच्या 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर हत्या आणि दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Indian student shot dead at grocery store in California in robbery by Indian origin youth latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV