इराण दहशतवादी हल्ल्यानं हादरला, साखळी हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू

By: | Last Updated: > Wednesday, 7 June 2017 11:53 PM
Iran parliament attack, latest news live updates open fire at Iran Parliament marathi news

तेहरान : ‘इस्लामिक स्टेट’सह सुन्नी दहशतवादी संघटनांचं लक्ष्य असलेला इराण आज साखळी हल्ल्यांनी हादरला. दहशतवाद्यांनी इराणची संसद, दिवंगत नेते अयातुल्लाह खोमेनी यांचं स्मारक आणि तेहराणमधील मेट्रो स्थानकावर एकाच वेळी हल्ला चढवला. या हल्ल्यांत आठ लोक जखमी झालेत आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सकाळी चार बंदुकधारींनी संसद परिसरात अंदाधुंद गोळीबार केला. तर आणखी एका आत्मघातकी स्फोटात एका हल्लेखोरानं स्वतःलाच संसदेत उडवलं.
यात 5 जणांचा मृत्यू झाला.

दुसरा हल्ला अयातुल्लाह यांच्या स्मारकावर दुसरा हल्ला झाला. इथेही दोन दहशतवाद्यांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं. तर एकाला सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातलं

संसदेवरील हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती इराणमधील निम सरकारी न्यूज एजन्सीने दिली आहे.

तीन सशस्त्र हल्लेखोरांनी इराणच्या संसदेत शिरकाव केला होता. त्यानंतर काही जणांना ओलिस ठेवल्याचंही म्हटलं जातं. हल्ल्याचं कारण आणि हल्लेखोराची ओळख अद्यापही अस्पष्ट आहे.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा कमिटीचे प्रवक्ते हुसैन नघवी हुसैनी यांनी सांगितलं.

या घटनेनंतर संसदकडे येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर इराणच्या गृहमंत्र्यांनी तेहरान प्रोविन्स सेक्यूरिटी काऊंसिलमध्ये तातडीची बैठक बोलावली होती.

First Published:

Related Stories

'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश
'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश

लंडन : डाळ आणि ‘चना डाळ’ हा भारतीयांच्या जेवणात सर्रास वापरण्यात

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट

सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा तिळपापड
सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा...

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कुरापती चालूच

पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना

वॉशिंग्टन : दोन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान

मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?
मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?

वॉशिंग्टन : जगातील दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुख नेत्यांची

... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी
... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या दिवशी

मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल...
मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत...

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका आणि