इरमा वादळानं अमेरिकेच्या मियामीत 10 लाख घरांना फटका

अमेरिकेत सध्या इरमा चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका मियामी शहराला बसला असून, वादळामुळे 10 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर तब्बल साडे सहा कोटी नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.

इरमा वादळानं अमेरिकेच्या मियामीत 10 लाख घरांना फटका

वाॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या इरमा चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका मियामी शहराला बसला असून, वादळामुळे 10 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर तब्बल साडे सहा कोटी नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.

कॅरेबिअन बेटांवर थैमान घातल्यानंतर आता हे वादळ फ्लोरीडाच्या किनारपट्टीला इरमा चक्रीवादळ धडकलं आहे. यामध्ये तब्बल 200 किमी प्रतीतासाच्या वेगानं वारे वाहत आहेत. तसेच जोरदार पाऊसही सुरु आहे. यामुळं सगळ्या फ्लोरीडामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वादळामुळे नागरिकांनाही रस्ते मार्गानं जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

सध्या या वादळामुळं फ्लोरीडातल्या साडे सहा कोटी नागरिकांवर स्थलांतरणाची वेळ आली आहे. तर 10 लाख घरांमधला वीजपुरवठा खंडित झाला आहे.

फ्लोरिडाचे गव्हर्नर रिक स्कॉट यांनी या चक्रीवादळाबाबत माहिती देताना सांगितलं की, ''इरमामुळे समुद्र किनाऱ्यावर 12 फूट उंचीच्या लाटा उठण्याची शक्यता आहे. याच्यासमोर कोणत्याही व्यक्तीचा निभाव लागणार नाही. त्यामुळे कोणीही समुद्र किनारी जाऊ नये''

सध्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मियामी शहर आणि ब्रोबार्ड काउंटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वादळानंतर मियामीत तुफान पाऊस सुरु आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV