'किल किम'... जपान आणि अमेरिकेचा मास्टरप्लॅन!

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला हादरवून टाकणारा हा हल्ला असेल आणि या कारवाईसाठी आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

'किल किम'... जपान आणि अमेरिकेचा मास्टरप्लॅन!

नवी दिल्ली : उत्तर कोरियाच्या कुरापती थांबवण्यासाठी जपान आणि अमेरिकेनं आता मास्टरप्लॅन तयार केला आहे. 'किल किम' या ऑपरेशन अंतर्गत जपान आणि अमेरिका किम जोंग उनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला हादरवून टाकणारा हा हल्ला असेल आणि या कारवाईसाठी आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

5 नोव्हेंबरला डोनाल्ड ट्रम्प जपानला जाणार आहेत.  हुकूमशहा किम जोंग उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवरच हा मास्टरप्लॅन आखल्याचं कळतं आहे.

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर अमेरिका आणि जपानच्या राजनैतिक अधिकारी सहमत झाले आहेत. त्यासाठी उत्तर कोरियावरील दबाव वाढवला जाणार आहे. मात्र ही रणनिती अयशस्वी ठरली, तर आगामी संकटांना सामोरं जाण्यासाठीही तयार राहायला हवं, असेही त्यांनी म्हटले आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV