उत्तर कोरियाच्या वाढत्या संकटामुळे जपानमध्ये मुदतपूर्व निवडणुका होणार

उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे.

उत्तर कोरियाच्या वाढत्या संकटामुळे जपानमध्ये मुदतपूर्व निवडणुका होणार

टोकियो : उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांमध्ये फुट पडल्याने सत्तेसाठी जास्त अडचण येणार नसल्याची आबे यांना आशा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात आबे सरकारच्या घोटाळ्यानंतरही विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये आबे यांच्याच पक्षाला आघाडी मिळताना दिसत आहे.

मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत देताना आबे यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी प्रतिनिधी सभा भंग करणार असल्याचं सांगितलं. तसेच मुदतपूर्व निवडणुकीसाठी पंतप्रधान आबे यांनी तारीख निश्चित केली नसून, स्थानिक वृत्तांनुसार 22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता होत आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेच्या निष्कर्षानुसार, उत्तर कोरियाच्या वाढत्या संकटामुळे राष्ट्रवादी आबे यांचे धोरण जपानी नागरिकांना चांगलेच आवडले आहे. उत्तर कोरियाने गेल्या काही दिवसात जपानच्या हवाई क्षेत्रातून दोन क्षेपणास्त्र डागली होती. तसेच जपानला बुडवण्याची धमकीही दिली आहे.

‘निक्केई’ या स्थानिक साप्ताहिकाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 44 टक्के मतदारांनी पारंपरिक लिबरल डेमोक्रेटिक पक्षाला जास्त पसंती दिली आहे. तर 8 टक्के लोकांनी विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला समर्थन दिलं आहे.

संबंधित बातम्या

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची धमकी, या देशांना त्सुनामीचा धोका

हायड्रोजन बॉम्ब टाकू, उ. कोरियाची अमेरिकेला धमकी

अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाचं काय होईल?

… तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करु, ट्रम्प यांचा थेट इशारा

जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन!

उत्तर कोरियाच्या कुरघोड्या सुरुच, जपानवरुन मिसाईलची चाचणी

युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध

अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV