अमेझॉनच्या संस्थापकाने बिल गेट्स यांचाही विक्रम मोडला, संपत्ती तब्बल...

जेफ बेजॉस हे अशी दुसरी व्यक्ती ठरली आहे, जिची संपत्ती 100 डॉलर कोटींहून अधिक झाली आहे. याआधी 1999 साली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या विक्रमाची नोंद केली होती.

अमेझॉनच्या संस्थापकाने बिल गेट्स यांचाही विक्रम मोडला, संपत्ती तब्बल...

मुंबई :  ई-कॉमर्स क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजॉस यांनी संपत्तीच्या बाबतीत बिल गेट्स यांचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्के वाढ झाल्याने संपत्ती 100.3 अब्ज डॉलर (सुमारे 6 लाख 46 हजार 575 कोटी रुपये) झाली आहे.

100 डॉलर कोटींहून अधिक संपत्ती असणारी जेफ बेजॉस ही दुसरी व्यक्ती ठरली आहे. याआधी 1999 साली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या विक्रमाची नोंद केली होती.

बिल गेट्स, जेफ बेजॉस आणि तिसऱ्या क्रमांकवर वॉरेन बफेट असा जगातील श्रीमंतांचा क्रम तयार झाला आहे.

बिल गेट्स किंवा तिसऱ्या क्रमांकावरील वॉरेन बफेट यांच्या तुलनेत जेफ बेजॉस हे समाजसेवेसाठी खूप पैसा खर्च करतात. मात्र ते करतच नाहीत, असेही नाही. बेजॉस यांनी जूनमध्येच ट्विटरवरुन विचारले होते की, समाजसेवेसाठी कशाप्रकारे मदत करायला हवी?

बेजॉस हे पहिल्यांदा 1998 साली फोर्ब्सच्या 400 सर्वात श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले होते आणि आता ते अव्वल स्थानी आले आहेत. सात महिन्यांपूर्वीच त्यांनी अमानसियो ऑर्टिगो आणि वॉरेन बफेट यांना मागे सारत बेजॉस जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Jeff bezos break bill gates record in property latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV