कुलभूषण जाधव आई-पत्नीला भेटणार!

पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला व्हीसा मंजूर केला आहे.

कुलभूषण जाधव आई-पत्नीला भेटणार!

इस्लामाबाद : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव अखेर उद्या (सोमवारी) आपल्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला व्हीसा मंजूर केला आहे.

पाकिस्तानने व्हिसा केल्याने उद्याच पाकिस्तानमध्ये त्यांची भेट होणार आहे. कुलभूषण यांना भेटल्यानंतर लगेच त्यादिवशीच त्यांचे कुटुंबीय भारतात परतणार आहेत. कुलभूषण यांच्या भेटीवेळी इस्लामाबादचे भारतीय उपउच्चायुक्तही उपस्थित राहणार आहेत.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kulbhushan jadhav to meet
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV