जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना : पंतप्रधान मोदी

By: | Last Updated: > Thursday, 6 July 2017 7:44 AM
live-narendra-modi-israel-tour-day-2-delegation-level-talks-between-india-and-israel-under-way-latest-updates-

जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय इस्रायलच्या दौऱ्याचा आजचा (दि. 5 जुलै) दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांना आज इस्रायलमधील भारतीय समुदायालाा संबोधित केलं.  70 वर्षात पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान इस्रायल दौरा करत असून, एका जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना आपल्या मनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, इस्रायमध्ये मराठी भाषेत ‘मायबोली’ नावाचं मासिक प्रकाशित होतं, याबद्दल आनंदही व्यक्त केला.

आपल्या सरकारची रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रांसफॉर्म ही त्रिसूत्री आहे. जीएसटी लागू झाल्याने देशाच्या अर्थकारणाला एकसूत्रात बांधण्यात आलंय याचाही उल्लेख मोदींनी केला.

आपल्या कार्यकाळात नियमावलीत सुसूत्रता आणल्याचं सांगून मोदी पुढं म्हणाले की, ”विद्यमान सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुतंवणुकीची मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लहानसहान गोष्टींसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. तसेच जर एखाद्या तरुणाला स्टार्टअप सुरु करायचं असेल, तर तो एका दिवसात नोंदणी करुन आपला उद्योग सुरु करु शकतो,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.

प्रत्येक भारतीयला घर देण्याबद्दल सांगिताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”2022 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठी 2022 पर्यंत आम्ही भारतातील सर्व गरीबांना घरं देणार आहेत. त्यासोबतच वीज आणि पाणी यासारख्या सुविधाही उपलब्ध करुन देण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.”

LIVE UPDATE

LIVE : 70 वर्षात पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानाचा इस्रायल दौरा, जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना : मोदी

LIVE : नेतान्याहू यांनी जो सन्मान दिला, तो 125 कोटी भारतीयांचा, हा सन्मान कधीही विसरणार नाही : मोदी

LIVE : नेतान्याहू यांना भारतीय अन्नपदार्थांविषयी प्रेम : मोदी

LIVE : भारत आणि इस्रायलच्या सणउत्सवांमध्येही साम्य : मोदी

LIVE : कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या आकारावर नव्हे, देशातील नागरिकांच्या विश्वासावर अवलंबून : मोदी

LIVE : इस्रायलमध्ये मराठी भाषेतील मायबोलीचं सतत प्रकाशन केलं जातं : मोदी

LIVE : इस्रायलने त्यांच्या कौशल्याने मोठ्या-मोठ्या देशांना मागे टाकलं : मोदी

LIVE : 2022 ला भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत भारतातील प्रत्येक गरीबाला हक्काचं घर देणार : मोदी

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:live-narendra-modi-israel-tour-day-2-delegation-level-talks-between-india-and-israel-under-way-latest-updates-
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका

नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश
सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं

रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली : रशियाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7

तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान
तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान

लॉस अँजेलस : सेल्फी घेण्याचा मोह आजकाल प्रत्येक वयोगटातील

फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'
फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'

लंडन : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका फेटाळली
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका...

इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया

प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

वॉशिग्टंन : गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत ‘फील्ड्स मेडल’

यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतीसुमने
यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प...

वॉशिंग्टन : अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या

पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू
पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू