लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 6 मृत्यूमुखी

By: | Last Updated: > Sunday, 4 June 2017 1:09 PM
london terror attack in uk one died latest updates

लंडन : शनिवार लंडनवासियांसाठी घातवार ठरला आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. प्रशासनानं अधिकृतरित्या या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू तर जवळपास 48 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

प्रसिद्ध लंडन ब्रिजवर एका भरधाव कारनं फूटपाथवरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडलं आहे, तर दुसऱ्या घटनेत लंडन ब्रिजजवळील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीनं त्याठिकाणी खात असलेल्या ग्राहकांवर चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य एका घटनेत वॉक्सहॉल परिसरात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर लंडन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसंच आसपासचे महत्त्वाचे रस्तेही बंद करण्यात आले. लंडन ब्रिज परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या हल्ल्यामुळे अडकलेल्या लोकांना मदतीसाठी हात पुढे केला आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण ब्रिटनसोबत असून लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

First Published:

Related Stories

'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश
'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश

लंडन : डाळ आणि ‘चना डाळ’ हा भारतीयांच्या जेवणात सर्रास वापरण्यात

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट

सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा तिळपापड
सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा...

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कुरापती चालूच

पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना

वॉशिंग्टन : दोन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान

मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?
मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?

वॉशिंग्टन : जगातील दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुख नेत्यांची

... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी
... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या दिवशी

मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल...
मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत...

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका आणि