आता बस झालं, आयसिसला अमेरिकेत घुसू देणार नाही : ट्रम्प

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 1 November 2017 10:04 AM
Manhattan Attack : We must not allow ISIS to return in America, says Donald Trump

न्यूयॉर्क : दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका पुन्हा हादरली. न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनमध्ये एक भरधाव ट्रक सायकल लेनमध्ये घुसून पादचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि 11 लोक जखमी झाले आहेत.

आता बस झालं!
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे. “आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही,” असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

“या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि तुमचा देश तुमच्यासोबत आहे,” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

न्यूयॉर्यचे लोक धैर्यशील, संयम सोडणार नाहीत : महापौर
हा भ्याड हल्ला असून निरपराधांना लक्ष्य केल्याची प्रतिक्रिया न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लेसियो यांनी दिली आहे. “आमचं धैर्य कमी करणं हा या हल्ल्यांमागचा उद्देश असतो. पण न्यूयॉर्कचे लोक धैर्यशील आहेत आणि ते संयम सोडणार नाहीत,” असं बिल डे ब्लेसियो म्हणाले.

अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींकडूनही शोक व्यक्त
दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा निषेध केला. मृतांच्या परिवाराच्या आणि जखमींच्या दु:खात मी सहभागी आहे, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.

रस्त्यावर नेमकं काय घडलं?
सेफुलो सायपोव असं 29 वर्षीय दहशतवाद्याचं नाव आहे. सेफुलो 2010 मध्ये अमेरिकेत आला होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास सेफुलो पिकअप ट्रक घेऊन सायकल आणि फूटपाथच्या लेनमध्ये घुसला आणि अनेकांना चिरडत निघाला. यानंतर या ट्रकने स्कूलबसला धडक दिली. यात दोन ज्येष्ठ नागरिकांसह दोन मुलं जखमी झाले. यानंतर ट्रक थांबला.

सेफुलो दोन हॅण्डगन घेऊन ट्रकमधून उतरला आणि घोषणा देऊ लागला. यानंतर घटनास्थळावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली, जी त्याच्या पोटात घुसली.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Manhattan Attack : We must not allow ISIS to return in America, says Donald Trump
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या
भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या

लंडन : विजय मल्ल्याविरोधातील प्रत्यर्पण केसवर सोमवारी यूकेच्या

जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...
जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...

फ्रँकफर्ट : तुम्ही कधी कार आणल्याचं विसरुन थेट घरी गेला आहात का? असं

ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी
ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी

टोकियो/मुंबई : भारतामध्ये एखादी ट्रेन पाच-दहा मिनिटं, अर्धा तास,

या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!
या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत
भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब
भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब

बिजिंग : भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब

कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या
कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या

झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं
झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं

हरारे : झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने

फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?
फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?

पॅरिस : शारीरिक संबंधांसाठी सहमती देण्याचं वय 13 वर्षांवर

इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती
इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती

मुंबई : भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली