मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा पाळणा हलणार!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 10 March 2017 10:20 AM
मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा पाळणा हलणार!

फोटो सौजन्य: मार्क झुकरबर्ग फेसबुक पेज

न्यूयॉर्क: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. झुकरबर्ग आणि पत्नी प्रिसिला हे पुन्हा आई-बाबा होणार आहेत. ही गोड बातमी स्वत: झुकरबर्गनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन दिली.

 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये झुकबर्ग म्हणतो की, ‘मी आणि प्रिसिला फार खुश आहोत, आम्हाला आणखी एका मुलीची आशा आहे.’

 

झुकरबर्गनं याबाबत एक संपूर्ण पोस्ट लिहली आहे. झुकरबर्ग म्हणतो की, ‘पहिली मुलगी ‘मॅक्स’च्या जन्मानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या बाळाचा विचार करु असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा मला प्रिसिला पुन्हा गरोदर असल्याचं समजलं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की, बाळ तंदुरुस्त असावं. त्याचवेळी माझ्या मनात विचार आला की, आम्हाला दुसरीही मुलगीच व्हावी.’

 

 

यावेळी झुकरबर्गनं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मी तीन बहिणींसोबत वाढलो तर प्रिसिलाही दोन बहिणींसोबत मोठी झाली. त्यामुळे आमच्या आयुष्यात मुलींचं स्थान खूप मोठं आहे. असं झुकरबर्ग म्हणाला.

 

दरम्यान, 2015 साली झुकरबर्गला पहिली मुलगी झाली होती. तिचं नाव मॅक्स ठेवण्यात आलं होतं.

 

संबंधित बातम्या:

 

‘फेसबुकचा बाप’ झाला बाप…

First Published: Friday, 10 March 2017 10:14 AM

Related Stories

जिओची प्राईम मेंबरशीप घेण्याची मुदत वाढणार?
जिओची प्राईम मेंबरशीप घेण्याची मुदत वाढणार?

मुंबई : रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईयर ऑफर 31 मार्चला संपणार आहे.

यूट्यूबवरुन नामांकित कंपन्यांच्या जाहिराती काढण्याच्या प्रमाणात वाढ
यूट्यूबवरुन नामांकित कंपन्यांच्या जाहिराती काढण्याच्या प्रमाणात...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवरुन विविध कंपन्यांकडून

मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी धडाकेबाज ऑफर
मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी धडाकेबाज...

नवी दिल्ली : बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी गुढीपाडव्यानिमित्त

मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक
मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक

मुंबई : नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार

कपिल शर्माच्या शोमध्ये काम करण्यावर कृष्णा अभिषेक म्हणतो...
कपिल शर्माच्या शोमध्ये काम करण्यावर कृष्णा अभिषेक म्हणतो...

नवी दिल्ली : कपिल शर्माकडून सुनील ग्रोवरला मारहाण झाल्यानंतर सुनील

शाओमी Redmi 4Aचा नवा विक्रम, 4 मिनिटात 250,000 फोन सोल्ड आऊट
शाओमी Redmi 4Aचा नवा विक्रम, 4 मिनिटात 250,000 फोन सोल्ड आऊट

मुंबई: शाओमी रेडमी 4Aचा पहिला फ्लॅश सेल काल (गुरुवार) झाला. अॅमेझॉन आणि

आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून बुकिंग
आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून बुकिंग

मुंबई : अॅपलच्या आयफोन रेडच्या प्री बुकिंगला आजपासून सुरुवात होणार

कुठंही जाताना GPS चा वापर करत असल्यास सावधान...
कुठंही जाताना GPS चा वापर करत असल्यास सावधान...

लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकजण अॅन्ड्रॉईड मोबाईलमुळं

जिओची नवी ऑफर, कॅशबॅकच्या माध्यमातून मोफत JIO प्राइम मेंबरशिप
जिओची नवी ऑफर, कॅशबॅकच्या माध्यमातून मोफत JIO प्राइम मेंबरशिप

मुंबई: रिलायन्स जिओची फ्री ऑफर 31 मार्चनंतर बंद होणार आहे. 1

...तरीही यूजर्स 'जिओ'ची साथ सोडणार नाही: सर्व्हे
...तरीही यूजर्स 'जिओ'ची साथ सोडणार नाही: सर्व्हे

मुंबई: एक एप्रिलपासून जिओ आपली मोफत सेवा बंद करणार आहे. त्यामुळे