अल्ट्रामॅन मिलिंद सोमण, 517 किमीची स्पर्धा अनवाणी पूर्ण

By: | Last Updated: > Monday, 20 February 2017 11:52 PM
Milind Soman Becomes ‘The Ultraman’ By Covering 517 Kilometers In 3 Days

ओरलँडो/मुंबई : एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने गेल्या वर्षी आयर्नमॅन हा किताब पटकावून वय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असतो, या वाक्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. आता एक पाऊल पुढे जात मिलिंदने आपण ‘अल्ट्रामॅन’ असल्याचं सिद्ध केलं आहे.

सर्वसामान्यांना 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावतानाही नाकी नऊ येतात. मात्र मिलिंद सोमणने वयाच्याच नाही, तर किलोमीटरच्या आकड्यांवरही मात केली आहे. 51 व्या वर्षी अल्ट्रामॅरेथॉनमध्ये त्याने केलेली कामगिरी निश्चित वाखाणण्याजोगी आहे.

काय असते अल्ट्रामॅरेथॉन?

पहिल्या दिवशी दहा किलोमीटर स्विमिंग आणि 142 किलोमीटर सायकलिंग, दुसऱ्या दिवशी 276 किमी सायकलिंग आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 84 किमी धावणे. विशेष म्हणजे मिलिंदने एकट्याने ही शर्यत अनवाणी पूर्ण केली आहे. 517.5 किमीची शक्यप्राय वाटणारी ही शर्यत मिलिंदसह पाच भारतीयांनी साध्य केली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेटमधल्या ओरलँडोमध्ये ही स्पर्धा पार पडली

मिलिंद सोमणसोबत अभिषेक मिश्रा, कौस्तुभ राडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमढ रेब्बा यांनी अल्ट्रामॅरेथॉन यशस्वीरित्या पार केली आहे. मिलिंदनेच फेसबुकवर त्याच्या कामगिरीची माहिती चाहत्यांना दिली आहे.

सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता ‘आयर्नमॅन’, सर्वात अवघड ‘ट्रायथलॉन’चं जेतेपद

झुरिचमधील सर्वात कठीण मानली जाणारी ट्रायथलॉन मिलिंद सोमणने गेल्या वर्षी यशस्वीपणे पार केली होती. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये 7 भारतीयांसह देशविदेशातील दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं.

वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. ‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 16 तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं.

मिलिंदने झुरिचच्या ट्रायथलॉनमध्ये पहिल्यांदाच सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे 16 तासांत पूर्ण करण्यास अवघड मानली जाणारी ही स्पर्धा त्याने 15 तास 19 मिनिटांतच पूर्ण केली होती.

आयर्नमॅनचा किताब 12 वेळा जिंकणाऱ्या पुण्याच्या कौस्तुभ राडकर यांनी अल्ट्रामॅरेथॉनमध्येही मिलिंद यांची साथ दिली.

आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या मातोश्रींची 76 व्या वर्षी दौड

मिलिंद यांच्या 76 वर्षीय मातोश्री उषा सोमण यासुद्धा गेल्या वर्षी दोन आठवडे चाललेल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. अहमदाबाद ते मुंबई अशा मॅरेथॉनमध्ये मिलिंद यांच्या सोबतीने त्याही सामील झाल्या. विशेष म्हणजे उषा सोमण यांनी अनवाणी ही मॅरेथॉन पूर्ण केली, तेही साडी नेसून. मिलिंद यांच्या आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

काही वर्षांपूर्वीही उषा सोमण यांनी 100 किमी अंतर 48 तासात पार केलं होतं. मुंबई ऑक्सफाम ट्रेलवॉकरमध्ये त्यांनी कोणतीही वैद्यकीय मदत न घेता हे अंतर कापलं. सोमण मायलेकांचा हा उत्साह तरुणांनाही लाजवणारा असून त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Milind Soman Becomes ‘The Ultraman’ By Covering 517 Kilometers In 3 Days
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या

मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत

मुंबई : ‘बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा’ अशी ख्याती असलेला

अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने

सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे.

बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते

पनामा पेपर्सप्रकरणी बिग बींसह 33 जण आयकर विभागाच्या रडारवर
पनामा पेपर्सप्रकरणी बिग बींसह 33 जण आयकर विभागाच्या रडारवर

मुंबई : पनामा पेपर प्रकरणाचं वादळ आता भारतातही घोंघावू लागलं आहे. या