जपानच्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर सायबर हल्ला

सायबर हॅकर्सनी जपानमधील एक एक्सचेंज हॅक करुन, 58 अब्ज येन ( भारतीय चलनानुसार 34 अब्ज रुपये) किमतीच्या क्रिप्टोकरन्सीवर डल्ला मारला आहे.

By: | Last Updated: 28 Jan 2018 12:51 PM
जपानच्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर सायबर हल्ला

 

टोकियो :  सायबर हॅकर्सनी जपानमधील एक एक्सचेंज हॅक करुन, 58 अब्ज येन ( भारतीय चलनानुसार 34 अब्ज रुपये) किमतीच्या क्रिप्टोकरन्सीवर डल्ला मारला आहे. जपानी मीडियाने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

‘कॉईनचेक एक्सचेंज’ने शुक्रवारी आपल्या वेबसाईटवर सांगितलं की, “ कंपनीने सध्या आपल्या NEM नावाच्या डिजिटल करन्सीची विक्री थांबवली आहे. शिवाय, इतरही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे”

शुक्रवारी रात्री आयोजित एका पत्रकार परिषदेत कॉईनचेक एक्सचेंजचे अध्यक्ष कोइचिरो वादा यांनी गुंतवणुकदारांची जाहीर माफी माफी मागितली. तसेच कंपनीने सध्या आर्थिक मदतीची मागणी केली असल्याचंही वादा यांनी स्पष्ट केलं.

कॉईनचेक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रावारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या सिस्टिममध्ये व्हायरस डिटेक्ट झाला. हा सायबर हल्ला 2014 मधील जपानच्या सर्वात मोठ्या बिटकाईन एक्सचेंज Mt.Gox वरील हल्ल्यापेक्षाही मोठा होता.

त्यावेळी सायबर हल्ल्यातून 48 अब्ज येन इतकी रक्कम हल्लेखोरांनी लांबवली होती.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: million lost in-hack-of-japan-cryptocurrency-exchang
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV