26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

डेली नयी खबर आणि मेट्रो न्यूज टीव्ही चॅनलसाठी काम करणाऱ्या झीनतचं दोन वर्षांपूर्वी अपहरण झालं होतं.

26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

लाहोर : दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या पाकिस्तानी पत्रकार तरुणीची सुटका करण्यात आली आहे. ठावठिकाणा लागत नसलेल्या भारतीय इंजिनिअरच्या केसवर काम करताना 26 वर्षीय झीनत शहजादी बेपत्ता झाली होती.

डेली नयी खबर आणि मेट्रो न्यूज टीव्ही चॅनलसाठी काम करणाऱ्या झीनतचं 19 ऑगस्ट 2015 रोजी अपहरण झालं होतं. लाहोरमधील गजबजलेल्या भागात झीनत राहायची. घरुन रिक्षाने ऑफिसला जाताना अज्ञात इसमांनी तिचं अपहरण केलं होतं.

पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरुन गुरुवारी रात्री तिची सुटका करण्यात आली. शुक्रवारी झीनतची तिच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यात आली. बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुनवा प्रांतातील आदिवासींनी तिच्या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावली.

हमीद अन्सारी हा भारतीय इंजिनिअर नोव्हेंबर 2012 मध्ये बेपत्ता झाला होता. त्याच्या केसवर झीनत काम करत होती. याच कारणामुळे तिचं अपहरण झाल्याचा संशय होता.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV