रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करणाऱ्या प्रेग्नंट मॉडेलला ट्रेनने उडवलं!

By: | Last Updated: > Friday, 17 March 2017 10:44 AM
रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करणाऱ्या प्रेग्नंट मॉडेलला ट्रेनने उडवलं!

प्रातिनिधीक फोटो

टेक्सास : रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करणाऱ्या एका प्रेग्नंट मॉडेलचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे.

नेवासोटामध्ये 19 वर्षीय फ्रेझानिया थॉम्पसन रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करत होती. पण त्याच वेळी ट्रेन आली आणि धडकेत तिचा मृत्यू झाला.

Fredzania_Thompson

रेल्वे ट्रॅकवरील तिचा हा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी फ्रेझानिया गरोदर होती. एका ट्रेनमधून उतरुन ती रेल्वे ट्रॅकवर फोटो काढत होती. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनने तिला उडवलं.

“फ्रेझानियाचं हे पहिलं फोटोशूट होतं. तिला हेच काम करायचं होतं,” असं फ्रेझानियाची आई हॅकेमी स्टिवेन्सन यांनी सांगितलं.

FREDZANIA THOMPSON

दुसरीकडे, ज्या ट्रेनने फ्रेझानियाला उडवलं, त्या ट्रेनची कंपनी, युनियन पॅसिफिकचे प्रवक्ते जेफ डी ग्राफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट सुरु असल्याचं आम्ही पाहिलं नाही. मात्र ट्रेन जवळ आल्यावर चालकांच्या टीमने फोटोग्राफर आणि इतरांना ट्रॅकवर पाहिलं. त्यांना अलर्ट करण्यात आलं. तसंच ट्रेन थांबवण्याचाही प्रयत्न केला.”

दरम्यान पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु घातपाताच्या शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.

First Published:

Related Stories

श्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू, हजारो लोकं बेघर
श्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू, हजारो लोकं बेघर

कोलंबो : भारतामध्ये पावसाची वाट पाहणं सुरु असतानाच तिकडे श्रीलंकेत

इजिप्तमध्ये बसवर दहशतवादी हल्ला, 23 जणांचा मृत्यू
इजिप्तमध्ये बसवर दहशतवादी हल्ला, 23 जणांचा मृत्यू

मिन्या (इजिप्त) : इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन लोकांना घेऊन

पाकिस्तान 'मौत का कुआं', भारतासारखा दुसरा देश नाही: उज्मा
पाकिस्तान 'मौत का कुआं', भारतासारखा दुसरा देश नाही: उज्मा

नवी दिल्ली: पाकिस्तानात ‘अडकलेली’ उज्मा अखेर आज (गुरुवार) भारतात

कुलभूषण यांचं इराणमधून अपहरण, ISI च्या माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट
कुलभूषण यांचं इराणमधून अपहरण, ISI च्या माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडावर आपटल्यानंतर

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मालवणचे लिओ वराडकर
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मालवणचे लिओ वराडकर

सिंधुदुर्ग : आयर्लंडच्या भावी पंतप्रधानाच्या विजयासाठी गाऱ्हाणं

मुंबईचा शेख नबी 12 वर्षांपासून पाकिस्तानातच, ISI साठी काम!
मुंबईचा शेख नबी 12 वर्षांपासून पाकिस्तानातच, ISI साठी काम!

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अटक झालेला भारतीय

190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया
190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया

जकार्ता : जंक फूड आणि आहाराच्या वाईट सवयींमुळे तुमच्या

व्हिडिओ : ब्रेकिंग न्यूज सांगताना कुत्र्याची स्टुडिओत एंट्री, अँकरला हसू अनावर!
व्हिडिओ : ब्रेकिंग न्यूज सांगताना कुत्र्याची स्टुडिओत एंट्री,...

मॉस्को : ब्रेकिंग न्यूज देताना अनेकदा अँकर आणि रिपोर्टरसोबत खूप

पाकिस्तानला झटका, ट्रम्प सरकार पाकिस्तानची रसद तोडणार
पाकिस्तानला झटका, ट्रम्प सरकार पाकिस्तानची रसद तोडणार

वॉशिंग्टन : सध्या आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तानची चोहोबाजूने

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, 'तो' व्हिडीओ दाखवून भारतावर हल्ल्याचा दावा
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, 'तो' व्हिडीओ दाखवून भारतावर हल्ल्याचा...

नवी दिल्ली : भारतीय सैन्यानं नौशेरामध्ये सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2