माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे : मोशे

By: | Last Updated: > Thursday, 6 July 2017 7:48 AM
mumbai terror attack survivor baby moshe meets pm modi latest update

तेल अवीव (इस्रायल): 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरुप बचावलेला चिमुकला मोशे याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यावेळी माशेने ‘पंतप्रधान मोदी आय लव्ह यू… माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे.’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी पंतप्रधान मोदींनी मोशे आणि त्याच्या कुटुंबीयांना दीर्घकाळाचा व्हिसा देण्याचं जाहीर केलं. ‘तुला हवं तेव्हा तू भारतात येऊ शकतो.’ असं मोदी यावेळी मोशे याला म्हणाले. 2008 साली मुंबईतील छबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-बाबा रिवका आणि गॅव्रिएल होल्टझबर्ग मारले गेले होते.

काय घडलं होतं त्या काळरात्री?

अतिरेक्यांनी ज्या छबाद हाऊसवर हल्ला केला. त्याच इमारतीतून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. मोशे आणि सँड्रा…

बेबी मोशे आपले वडील गॅव्रिएल आणि आई रिवका यांच्यासोबत होता. अतिरेकी थेट इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पहिल्याच हल्ल्यात मोशे अनाथ झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मात्या-पित्यांच्या मृतदेहासमोर बसून मोशे रडत होता. पण त्याचवेळी मोशेसाठी धावून आली त्याची केअरटेकर सँड्रा.

बेबी मोशेला आपल्या छातीशी कवटाळून सँड्रा लपून बसली. पण बाहेर गोळीबाराच्या फैरी झडतच होत्या. घमासान सुरुच होतं. एनएसजी गार्ड्स दाखल झाले आणि तब्बल 24 तासांच्या थरारानंतर या दोघांची सुटका झाली.

आई-वडिलांवरच्या अंत्यसंस्कारानंतर मोशे आजी आजोबांकडे इस्त्रायलला गेला. सोबत मोशेला वाचवणारी सँड्राही तिथेच स्थिरावली. मोशे आता इस्त्रायलचा नागरिक आहे. सँड्रालाही नागरिकता बहाल करण्यात आली आहे. दोघेही सुखात आहेत फक्त त्या काळरात्रीच्या आठवणी मनात साठवून…

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:mumbai terror attack survivor baby moshe meets pm modi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका

नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश
सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं

रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली : रशियाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7

तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान
तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान

लॉस अँजेलस : सेल्फी घेण्याचा मोह आजकाल प्रत्येक वयोगटातील

फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'
फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'

लंडन : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका फेटाळली
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका...

इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया

प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

वॉशिग्टंन : गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत ‘फील्ड्स मेडल’

यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतीसुमने
यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प...

वॉशिंग्टन : अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या

पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू
पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू