यूएईमध्ये मुस्लीम महिलेचं धाडस, आगीतून भारतीय ट्रक चालकाला वाचवलं

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एका मुस्लीम महिलेने आगीतून भारतीय ट्रक चालकाचा जीव वाचवला. जवाहर सैफ अल कुमैती असं या तरुणीचं नाव असून, तिने मोठ्या धाडसाने भारतीय ट्रक चालकाला आगीतून वाचवलं.

By: | Last Updated: 02 Oct 2017 11:05 PM
यूएईमध्ये मुस्लीम महिलेचं धाडस, आगीतून भारतीय ट्रक चालकाला वाचवलं

आबू धाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एका मुस्लीम महिलेने आगीतून भारतीय ट्रक चालकाचा जीव वाचवला. जवाहर सैफ अल कुमैती असं या तरुणीचं नाव असून, तिने मोठ्या धाडसाने भारतीय ट्रक चालकाला आगीतून वाचवलं.

अधिक माहितीनुसार, 22 वर्षीय जवाहर सैफ अल कुमैती रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या मैत्रिणीला पाहून घरी जात होती. याच वेळी तिने रास अल-खैमामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात होऊन, ते दोन्ही ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं पाहिलं.

याचवेळी या आगीमध्ये एक व्यक्ती अडकल्याचं तिला समजलं. तो व्यक्ती जोरजोरात ओरडून वाचवण्याचं आवाहन करत होता. यानंतर जवाहरने मोठ्या धाडसाने आग विझवत, त्यातील भारतीय ट्रक चालकाला बाहेर काढले.

दरम्यान, या घटनेत जखमी भारतीय ट्रक चालकाचं नाव हरकिरत सिंह असं आहे. तसेच यात हरकिरत सह आणखी एका ट्रकमधील चालक 40 ते 50 टक्के भाजले आहेत. दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV