बांगलादेशचं विमान नेपाळमध्ये कोसळलं, 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं आहे.

बांगलादेशचं विमान नेपाळमध्ये कोसळलं, 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवेवर उतरताना विमान कोसळलं.

लँडिगच्या वेळी विमान रनवेच्या बाजूने झुकलं आणि तेव्हाच त्यात आग लागली. यानंतर ते जवळच्या फुटबॉल ग्राऊंडमध्ये पडलं. स्थानिक मीडियानुसार, सोमवारी दुपारी हा अपघात झाला. विमान ढाक्याहून काठमांडूला येत होतं. हे विमान दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी लँड करणार होतं.

विमान कोसळलं त्यावेळी त्यात 67 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते, असं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर 17 जखमींना आतापर्यंत वाचवण्यात आलं असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.नेपाळी सैन्याकडूनही बचाव कार्य सुरु आहे, असं पर्यटन मंत्रालयाचे सचिव सुरेश आचार्य यांनी सांगितलं.

तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nepal : Bangladeshi plane crash-lands at Tribhuvan International Airport in Kathmandu
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV