नयनरम्य रोषणाई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं स्वागत

ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करून 2018 चं स्वागत करण्यात आलं.

नयनरम्य रोषणाई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं स्वागत

ऑकलंड : नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करून 2018 चं स्वागत करण्यात आलं.

स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत  करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील सिडनीत देखील नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. जगप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

भारतातही नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. कोकण, गोवा यांसह अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहे. मुंबईतील गेट ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गर्दी करत असतात.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: New year celebration in New Zealand and Australia
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV