ICAN संस्थेला शांततेचा नोबेल, अण्वस्त्रविरोधी जनजागृतीचा सन्मान

आयसीएएन ही स्वयंसेवी संस्था असून, जगभरातील 101 देशांमध्ये काम करते.

ICAN संस्थेला शांततेचा नोबेल, अण्वस्त्रविरोधी जनजागृतीचा सन्मान

स्वीडन : यंदाचा शांततेचा नोबेल कुणाला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे. अण्वस्त्रविरोधी जनजागृती करणाऱ्या इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स (ICAN) या संस्थेचा शांततेच्या नोबलेने गौरव करण्यात आला आहे.

यंदा शांततेच्या नोबेलसाठी 215 व्यक्ती, तर 103 संस्थांची नावं यादीत होती. त्यातून आयसीएएन या संस्थेची निवड झाली.

आयसीएएन ही स्वयंसेवी संस्था असून, जगभरातील 101 देशांमध्ये काम करते.

इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स (ICAN) या संस्थेची स्थापना 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 साली ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये झाली. स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये संस्थेचं मुख्यालय आहे.

अणुबॉम्बच्या वापरामुळे मानवावर होणाऱ्या परिणामांबाबत ग्राऊंड लेव्हलला जनजागृती करण्याचं मोठं काम आयसीएएनने केले आहे. आयसीएएनच्या मानवतावादी कामाचा गौरव नोबेल पुरस्काराच्या समितीकडून करण्यात आला आहे.

पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले, आयसीएएनला पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे अण्वस्त्रमुक्त जगाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV