हायड्रोजन बॉम्ब टाकू, उ. कोरियाची अमेरिकेला धमकी

"जर अमेरिकेने आमच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तर आम्ही आमचा शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पॅसिफिस महासागरात टाकू," असंही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

हायड्रोजन बॉम्ब टाकू, उ. कोरियाची अमेरिकेला धमकी

न्यूयॉर्क : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेला आव्हान दिलं आहे. अमेरिकेजवळ पॅसिफिक महासागरात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवून हादरवून टाकू अशी धमकी उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि योंग हो यांनी दिली आहे. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला त्यांनी भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली होती.

"जर अमेरिकेने आमच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तर आम्ही आमचा शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पॅसिफिस महासागरात टाकू," असंही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना धमक्यांची किंमत मोजावी लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे.

"पॅसिफिक महासागरातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. यासाठी काय कारवाई करावी लागेल, हे आम्हाला माहित नाही. कारण किम जोंग उन यांच्या आदेशानंतरच कारवाई केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर किम जोंग कठोर पावलं उचलण्याचा विचार करत आहेत," असं री योंग हो यांनी सांगितलं.

संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या पहिल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला पूर्णत: नष्ट करण्याची धमकी दिली होती. रॉकेट मॅन (किम) स्वत:साठी आणि स्वत:च्या देशासाठी सुसाईड मिशनवर आहेत. जर उत्तर कोरियाने अमेरिका आणि मित्र राष्ट्रांवर हल्ला केला, तर प्योंगयांग उद्ध्वस्त करण्याशिवाय वॉशिंग्टनकडे पर्याय शिल्लक राहणार नाही, असं ट्रम्प म्हणाले होते.

या महिन्याच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाने आपल्या सर्वात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं होतं. या बॉम्बच्या स्फोटामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता.

हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय?
हायड्रोजन बॉम्बला थर्मोन्युक्लिअर बॉम्बही म्हटलं जातं.
हायड्रोजन बॉम्बची संहारक क्षमता अणुबॉम्बपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे.
हायड्रोजन बॉम्बची पहिली चाचमी अमेरिकेने 1 नोव्हेंबर 1952 ला घेतली
त्यापाठोपाठ रशियाने ऑक्टोबर 1961 मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली
सुदैवाने आजवरच्या कोणत्याही युद्धात या बॉम्बचा वापर झाला नाही

Hydrogen_Bomb

हायड्रोजन बॉम्ब टाकल्यास काय होईल?
उत्तर कोरियाने वॉशिंग्टनवर 10 किलोटनचा हायड्रोजन बॉम्ब टाकल्यास एक लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतील.
1 लाख 75 हजारांपेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी होतील.
औषधोपचार सुरु करण्यापूर्वीच 50 ते 90 टक्के लोक मरतील
औष्णिक किरोणत्सर्गामुळे संपूर्ण शरीर भाजून निघते
वेदनांची जाणीव करुन देणाऱ्या शिराही नष्ट होत असल्याने औष्णिक किरणोत्सर्गामुळे भाजल्याच्या वेदनाही होत नाहीत
शरीरातील अवयव आयुष्यभरासाठी निकामी होऊ शकतात.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV