ओसामा बिन लादेन चक्क कुमार सानू-अल्का याज्ञिकचा फॅन!

ओसामाच्या कम्प्युटरमध्ये नर्सरीतली बडबड गीतंही होती. शिवाय ओसामाला टॉम अँड जेरीचे कार्टून्सही आवडायचे.

By: | Last Updated: > Friday, 3 November 2017 6:16 PM
Osama Bin Laden was fan bollywood singers Kumar Sanu, Alka Yadnik latest update

न्यूयॉर्क : अख्ख्या जगाला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन चक्क आपल्या बॉलिवुडच्या प्रेमात होता. कुमार सानू, उदित नारायण, अल्का याज्ञिक यासारखी नव्वदच्या दशकातील गायक मंडळी ओसामाची फेव्हरेट असल्याचं समोर आलं आहे.

दिलजल्यांचा तारणहार कुमार सानू ओसामाला प्रचंड आवडायचा. उडत्या चालींची गाणी गाणारा उदित नारायणही ओसामाला भुरळ घालायचा. फक्त गायकच नाही, तर गायिकांच्याही प्रेमात ओसामा पडला होता. अलका याज्ञिक तर ओसामाची मोस्ट फेव्हरेट.

2011 साली अबोटाबादमधल्या ओसामाच्या घरात केलेल्या ऑपरेशन जेरोनिमोमध्ये सील कमांडोजनी त्याचा खात्मा केला. त्यावेळी त्याच्या घरातला कम्पुटरही जप्त करण्यात आला. त्यातील तब्बल 4 लाख 70 हजार फाईल्स सीआयएनं रिट्राईव्ह केल्या आहेत.

आत्मघातकी स्फोटांची प्रात्यक्षिकं, सामूहिक हत्या, नाईन-ईलेव्हनच्या कटाच्या अनेक फाईल्स, आयसिससोबतचे मतभेद, काश्मीरसंदर्भातल्या बातम्या… अशा अनेक फाईल्स या कम्प्युटरमध्ये दडल्या होत्या.

त्यातल्या काही फाईल्स सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेऊन, बाकीच्या सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. त्यात ही माहिती समोर आली आहे.

ओसामाच्या या कम्प्युटरमध्ये नर्सरीतली बडबड गीतंही होती. शिवाय ओसामाला टॉम अँड जेरीचे कार्टून्सही आवडायचे. त्याच्या या कम्प्युटरमध्ये अँट्स आणि कार्स ही अॅनिमेटेड फिल्मही होती.

या कम्प्युटरमधून ओसमाला स्पोर्ट्सचंही वेड असल्याचं समोर आलं आहे. फिफा वर्ल्डकपमधले बेस्ट गोलही त्यानं या कम्प्युटरमध्ये सेव्ह करुन ठेवले होते.

ब्राझिलचा गारिन्चा, कॅमरूनचा रॉजर मिला, स्पेनचा फर्नांडो टोरेस हे त्याचे आवडते खेळाडू. त्यांनी केलेले भन्नाट गोल्स ओसामानं आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करुन ठेवले होते.

ओसामा किती क्रूर होता, हे अख्ख्या जगानं पाहिलं. पण त्याची नजर भारतावरही होती. कारण त्याच्या कम्प्युटरमध्ये दिल्लीतल्या 2010 च्या हॉकी वर्ल्डकपच्या सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांच्या फाईल्सही त्याच्याकडे होत्या. शिवाय स्टोरी ऑफ इंडियाची अख्खी सीरिज त्याच्याकडे होती. पण भारताकडे त्याची वाकडी नजर वळण्याआधीच त्याचा खात्मा झाला.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Osama Bin Laden was fan bollywood singers Kumar Sanu, Alka Yadnik latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

व्हायरल सत्य : वर्दीतील 'ही' महिला बठिंडा पोलिस स्टेशनची एसएचओ?
व्हायरल सत्य : वर्दीतील 'ही' महिला बठिंडा पोलिस स्टेशनची एसएचओ?

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ह्या महिला पोलिसाचे फोटो व्हायरल होत

दिलदार प्रभास, तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना 75 लाखांची मदत
दिलदार प्रभास, तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना 75 लाखांची मदत

मुंबई : बाहुबली चित्रपटात अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली यांचा

वादग्रस्त 'पद्मावती'चा आज सुप्रीम कोर्टात फैसला
वादग्रस्त 'पद्मावती'चा आज सुप्रीम कोर्टात फैसला

नवी दिल्ली : अनेकांच्या विरोधाला बळी पडलेल्या पद्मावतीचा फैसला आज

मी रणवीरला डेट करणार : दीपिका पदुकोण
मी रणवीरला डेट करणार : दीपिका पदुकोण

मुंबई : दीपिका पदुकोणचा ‘पद्मावती’ सिनेमा सध्या वादाच्या

दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, भाजप नेत्याचं वक्तव्य
दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, भाजप नेत्याचं वक्तव्य

नवी दिल्ली : पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत

... तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात
... तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

लखनौ : वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली

अरबाज खानला सनी लिओनीसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा
अरबाज खानला सनी लिओनीसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा

मुंबई : बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनीसोबत अभिनेता अरबाज

'पद्मावती' चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा
'पद्मावती' चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

मुंबई : ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

'न्यूड'ची कथा माझ्या कथेवरुन चोरली, हिंदी लेखिकेचा आरोप
'न्यूड'ची कथा माझ्या कथेवरुन चोरली, हिंदी लेखिकेचा आरोप

नवी दिल्ली: गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून हटवण्यात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज
‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

नवी दिल्ली : ‘पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेला वाद थांबण्याचं