हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी, पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य

दहशतवाद्यांचा कारखाना बनलेल्या पाकिस्तानने अखेर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी असल्याचं मान्य केलं आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 27 September 2017 8:54 PM
pakistan foreign minister khawaja asif statment on hafij saeed

न्यूयॉर्क : दहशतवाद्यांचा कारखाना बनलेल्या पाकिस्तानने अखेर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी असल्याचं मान्य केलं आहे. तसेच सईदसारख्या दहशतवाद्यांसाठी आम्हाला दोषी धरु नका, असं विनवणी पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.

आसिफ मंगळवारी अशिया सोसायटी फोरमला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “इस्लामाबादची सर्व सूत्रं हक्कानी नेटवर्क, हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबाच्या हाती आहेत, हे म्हणणं सहज सोपं आहे. पण हे लोक आमच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्यापासून पिछा सोडवण्यासाठी पाकिस्तानाला थोडा वेळ जाईल, कारण, सध्या या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी पाकिस्तानकडे पुरसा पैसादेखील नाही.”

ते पुढं म्हणाले की, “अम्हाला हक्कानी नेटवर्क आणि हाफिज साईदसाठी दोष देऊ नका. कारण, 20 ते 30 वर्षांपूर्वी हे तुम्हाला (अमेरिकेला) प्रिय होते. या लोकांचं व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत होत होतं. आणि आता तुम्ही म्हणता, पाकिस्ताननं नर्कात जावं, कारण, या लोकांना पाकिस्ताननं पोसलं आहे.”

यावेळी अफगाणिस्तान प्रश्नावरुनही आसिफ यांनी अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. “अफगाणिस्तानात शांतता प्रस्तापित व्हावी, अशी पाकिस्तानची पण इच्छा आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण शांतता प्रस्थापित करण्यात पाकिस्तानलाही काही मर्यादा येत आहेत. एकटा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या शांततेची जबाबदारी घेऊ शकत नाही. यासाठी जगातल्या ज्या काही बलाढ्य महाशक्ती आहेत, त्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत.” असं त्यांनी यावेळी सांगितलं.

हाफिज सईद 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्लात एकूण 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भारताकडून सातत्यानं मागणी होत आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:pakistan foreign minister khawaja asif statment on hafij saeed
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला
काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री

26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका
26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

लाहोर : दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या पाकिस्तानी पत्रकार

ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा
ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

ओमान : ओमानमध्ये 61 व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित

पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या
पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या

वलेत्ता : पनामा पेपर्समधून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करुन जगाला

जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना
जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना

लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर

सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी
सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील

कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात
कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत

'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या
'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या

वॉशिंग्टन : जगभरात मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून

अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश
अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश

अबुधाबी : अबुधाबीमध्ये आयोजित एका मेगा लकी ड्रॉमध्ये दहा जणांना

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

स्टॉकहोम (स्वीडन): यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे