जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये

जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तानच्या नावाचा टॉप 20 मध्ये समावेश झाला आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधलं आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 1 November 2017 5:14 PM
Pakistan in top 20 of fragile states index 2017 annual report

फाईल फोटो

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तानच्या नावाचा टॉप 20 मध्ये समावेश झाला आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधलं आहे.

अमेरिकेने पाकिस्तानाला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करण्याचा वारंवार समज देऊनही, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची ओळख संपूर्ण जगात दहशतवाद्यांचा आश्रित देश म्हणून झाली आहे.

अमेरिकेतील एका प्रतिनिधी सभेतही पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी एक प्रस्ताव नुकताच देण्यात आला होता. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही दहशतवादी कारवायांवरुन पाकिस्तानच्या नेतृत्वाला खडेबोल सुनावले होते.

विशेष म्हणजे,  पाकिस्तानला सातत्यानं पाठिशी घालणाऱ्या चीनमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीतही एक संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं. यात पाकिस्तानाने किती दहशतवादी संघटनांना आश्रय दिला याची आकडेवारीसह नावं प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यातच आता फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पाकिस्तानचा टॉप 20 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. पाकिस्तानचा या यादीत 18 वा क्रमांक असून, त्यामुळे पाकिस्तानचं खरं रुप पुन्हा जगासमोर आलं आहे.

FRAGILE STATE INDEX 2017

फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही पाकिस्ताननं देशांतर्गत असणाऱ्या अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे. पाकिस्ताननं शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी पाठवून अस्थिरता पसरवण्यापेक्षा देशांतर्गत सुरक्षेचा विचार आधी करावा, असंही या अहवालातून पाकिस्तानला खडसावण्यात आलं आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pakistan in top 20 of fragile states index 2017 annual report
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, 235 जणांचा मृत्यू  
इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, 235 जणांचा मृत्यू  

सिनई (इजिप्त) : दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा इजिप्त हादरलं

हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं
हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं

वॉशिंग्टन : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11

26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार
26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार

नवी दिल्ली : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील

हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता
हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या

ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर
ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर

लंडन : कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, असं आपण अनेकदा

जेव्हा मुख्य महामार्गावर विमान कोसळतं...
जेव्हा मुख्य महामार्गावर विमान कोसळतं...

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रविवारी विचित्र अपघात झाला.

2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता, वैज्ञानिकांचा इशारा
2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता, वैज्ञानिकांचा इशारा

मुंबई : आजवर अनेक भविष्यवेत्त्यांनी पृथ्वीच्या सर्वनाशाची भाकितं

भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश
भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे...

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा

भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या
भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या

लंडन : विजय मल्ल्याविरोधातील प्रत्यर्पण केसवर सोमवारी यूकेच्या

जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...
जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...

फ्रँकफर्ट : तुम्ही कधी कार आणल्याचं विसरुन थेट घरी गेला आहात का? असं