शाळा नाही, वसतिगृह नाही, 37 मुलांचा पिता गुलजार खान

गुलजार यांना ३ बायकांपासून आतापर्यंत 37 मुलं आहेत. त्यांचा दीडशे जणांचा मोठा परिवार आहे.

Pakistani man Gulzaar Khan with 37 kids latest update

इस्लामाबाद : माणसांनी गजबजलेली ही इमारत पाहून कोणाला ही शाळा आहे, असं वाटेल. तर कोणाला ते वसतीगृह वाटेल. मात्र हा एका माणसाचा वंशवेल आहे. हम चार और हमारे 37 असं समीकरण असलेला हा इसम पाकिस्तानात पाहायला मिळेल.

हम दो, हमारे दो असा मुलांबाबतचा ट्रेंड असला तरी पाकिस्तानातलं एक कुटुंब याला अपवाद आहे. कारण त्यांचं हम 4 और हमारे 37 असं समीकरण आहे. हल्ली एकदोन लेकरांना सांभाळताना डोक्याचं भजं होतं,  पण इस्लामाबादच्या गुलजार खान यांचं आणि त्यांच्या तीन पत्नींचं मात्र बरंच वेगळं आहे.

गुलजार यांना ३ बायकांपासून आतापर्यंत ३ डझनपेक्षा जास्त मुलं आहेत. त्यांचा दीडशे जणांचा मोठा परिवार आहे. उत्तरी वझिरिस्तानमध्ये राहणाऱ्या गुलजार यांनी वयाची साठी गाठली आहे.

अल्लाह जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला अन्न देतो, अशी गुलजार यांची भावना आहे. शिवाय क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्या मुलांना दुसरी टीम लागणार नाही. इतकंच नाही, तर घरातल्या घरात तिरंगी मालिकाही आपण भरवू शकतो, असं ते मिश्किलपणे सांगतात.

ईश्वरानं मनुष्याची निर्मिती केली. त्यांचा जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया असताना ती रोखणारे आपण कोण? असा सवालही ते इतरांना विचारतात.

विशेष म्हणजे गुलजार यांचे बंधू मस्तान यांनाही तीन पत्नींपासून 22 मुलं आहेत. त्यामुळे मिया-बिवी राजी, बढने दो आबादी, असंच या चौघांचं सूत्र आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pakistani man Gulzaar Khan with 37 kids latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, 235 जणांचा मृत्यू  
इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, 235 जणांचा मृत्यू  

सिनई (इजिप्त) : दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा इजिप्त हादरलं

हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं
हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं

वॉशिंग्टन : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11

26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार
26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार

नवी दिल्ली : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील

हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता
हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या

ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर
ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर

लंडन : कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, असं आपण अनेकदा

जेव्हा मुख्य महामार्गावर विमान कोसळतं...
जेव्हा मुख्य महामार्गावर विमान कोसळतं...

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रविवारी विचित्र अपघात झाला.

2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता, वैज्ञानिकांचा इशारा
2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता, वैज्ञानिकांचा इशारा

मुंबई : आजवर अनेक भविष्यवेत्त्यांनी पृथ्वीच्या सर्वनाशाची भाकितं

भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश
भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे...

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा

भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या
भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या

लंडन : विजय मल्ल्याविरोधातील प्रत्यर्पण केसवर सोमवारी यूकेच्या

जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...
जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...

फ्रँकफर्ट : तुम्ही कधी कार आणल्याचं विसरुन थेट घरी गेला आहात का? असं