पाकिस्तानाच्या 'हिंदू विवाह बिल-2017'वर राष्ट्रपती हुसैन यांची स्वाक्षरी

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 7:47 PM
पाकिस्तानाच्या 'हिंदू विवाह बिल-2017'वर राष्ट्रपती हुसैन यांची स्वाक्षरी

इस्लामाबाद : पाकिस्तानातील हिंदूंसाठी दिलासा देणारी घटना आज घडली आहे. कारण बहुप्रतिक्षित हिंदू विवाह बिल-2017 वर राष्ट्रपती ममनून हुसैन यांची स्वाक्षरी झाली असून, आता पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंसाठी विवाहाचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात असेल. विशेष म्हणजे, या कायद्यामुळे येथील हिंदू समाज आता आपल्या परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न करु शकणार आहेत. तसेच हिंदू तरुण-तरुणींच्या लग्नामध्ये येणारे अडथळे या कायद्यांमुळे दूर होणार आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या कार्यालायाकडून ही माहिती देण्यात आली. यापूर्वी या कायद्याला पाकिस्तानच्या संसदेनं 9 मार्च रोजी मान्यता दिली होती. यानंतर राष्ट्रपतींच्या मंजूरीसाठी हे राष्ट्रपती भवनाकडं पाठवण्यात आलं होतं. या कायद्याच्या मंजूरीसाठी पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाज बऱ्याच वर्षांपासून वाट पाहात होता. त्यामुळे त्यांना आता विवाहाचा स्वतंत्र अधिकार मिळाला आहे.

या मंजूरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत पाकिस्तानातील हिंदू इतर व्यक्तींप्रमाणे देशभक्त असल्याचं म्हणलं आहे. तसेच त्यांनाही समान हक्क मिळाले पाहिजेत, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर तत्काळ या कायद्याची पाकिस्तानात अंमलबजावणी केली जाईल. मात्र, सिंध प्रांतात हिंदूंच्या लग्नासाठी स्वतंत्र कायदा लागू असल्याने हा कायदा तिथं लागू करण्यात येणार नाही.

कायद्याच्या मंजूरीचे फायदे

  • या कायद्यामुळे हिंदूंना लग्नाचा अधिकार प्राप्त असेल.
  • याशिवाय लग्नानंतर पती-पत्नी कायदेशीररित्या विभक्त झाल्यास, त्यांच्या आपत्यांसाठी आर्थिक मदतीची विशेष सोय असेल.
  • लग्न झालेल्या व्यक्तीला लग्न करण्यासाठी आणि विधवा विवाहासाठीही या कायद्यात वेगळी तरतूद केली आहे.
  • या कायद्याने पूर्वीच्या हिंदू लग्नांना कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच जुने वाद सोडवण्यासाठी कौटुंबिक कोर्टात ते चालवले जातील.
  • या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस कडक शिक्षेची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये एक लाखांचा दंड आणि तुरुंगवास आदी शिक्षांची तरतूद आहे.
First Published:

Related Stories

प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर दिवाळखोर घोषित
प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर दिवाळखोर घोषित

लंडन : टेनिस चॅम्पियन बोरिस बेकरला कोर्टाने दिवाळखोर घोषित केलं

पाण्यात पडलेल्या लेकराला वाचवण्यासाठी हत्तीणीची जिवाची शर्थ
पाण्यात पडलेल्या लेकराला वाचवण्यासाठी हत्तीणीची जिवाची शर्थ

नवी दिल्ली : अडचणीत असलेल्या मुलाला आई-वडिलांनी वाचवल्याचे अनेक

1 जुलैपासून सौदी अरबमध्ये 'फॅमिली टॅक्स', 41 लाख भारतीय अडचणीत
1 जुलैपासून सौदी अरबमध्ये 'फॅमिली टॅक्स', 41 लाख भारतीय अडचणीत

रियाध (सौदी अरब): 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे.

स्विस बँकेत भारतीयांचा अपेक्षेपेक्षा कमी पैसा
स्विस बँकेत भारतीयांचा अपेक्षेपेक्षा कमी पैसा

नवी दिल्ली : इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचा अत्यंत कमी पैसा स्विस

पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू
पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू

लिस्बन : मध्य पोर्तुगालमधल्या पेड्रोगन ग्रँड परिसरात लागलेल्या

चीनमध्ये केजी शाळेबाहेर स्फोट, 7 जणांचा मृत्यू, 66 जखमी
चीनमध्ये केजी शाळेबाहेर स्फोट, 7 जणांचा मृत्यू, 66 जखमी

बीजिंग : पूर्व चीनमधील एका केजी शाळेबाहेर झालेल्या शक्तिशाली

तुम्ही आमच्यासोबत आहात, की कतारसोबत? सौदी राजांचा पाकला सवाल
तुम्ही आमच्यासोबत आहात, की कतारसोबत? सौदी राजांचा पाकला सवाल

इस्लामाबाद : आखाती देशांत कतारला एकाकी पाडण्यासाठी सौदी अरेबियाने

विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!
विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात

लंडनमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, अनेकांचा मृत्यू
लंडनमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, अनेकांचा मृत्यू

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ग्रेनफेल टॉवर या इमारतीला भीषण आग