नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं

नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं आहे.

By: | Last Updated: > Friday, 28 July 2017 1:11 PM
Panama Papers Hearing LIVE News, Supreme Court disqualifies Nawaz Sharif

इस्लामाबाद : नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं आहे. पनामागेट प्रकरणात अडकलेल्या नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तसंच अर्थमंत्री इशाक दार यांनाही पदावरुन हटवलं आहे.

पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 11:30 वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि दुपारी 12.30 च्या सुमारास न्यायालायने निकाल दिला.

शरीफ यांचा धाकटा भाऊ पंतप्रधान?
नवाज शरीफ यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांचा धाकटा भाऊ शहबाज शरीफ यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहबाज हे नवाज शरीफ यांची जागा घेऊ शकतात, अशी चर्चा पाकिस्तानी मीडियामध्ये आहे.

पनामा पेपर्स काय आहे?
पनामा पेपर्स सध्याचा जगभरात टॉप ट्रेडिंग टॉपिक आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.

11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.

यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.

पनामा पेपर्समध्ये कोणाकोणाची नावं?
जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.

संबंधित बातम्या

पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

पनामा पेपर्समध्ये कोणा कोणाची नावं आहेत?

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Panama Papers Hearing LIVE News, Supreme Court disqualifies Nawaz Sharif
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य...

दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन

भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश
भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश

भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू
भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू

लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी

चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!
चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!

पेइचिंग : चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची

दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार
दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार

लंडन : दक्षिण युरोपातील नागरिकांना सध्या भीषण तापमानाचा सामना

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी
पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या...

मुंबई: मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यसह