दक्षिण सुदानमध्ये लँडिंगवेळी विमानात आग, 49 जण थोडक्यात बचावले!

दक्षिण सुदानमध्ये लँडिंगवेळी विमानात आग, 49 जण थोडक्यात बचावले!

जाबू : धावपट्टीवर उतरत असताना विमानात आग लागली आणि एकच खळबळ उडाली. दक्षिण सुदानमधील सुप्रीम एअरलाईनच्या विमानात ही घटना घडली.

विमानातील पायलटसह इतर कर्मचारी आणि 49 प्रवासी सुखरुप आहेत. जाबूहून वाऊच्या दिशेने हे विमान जात होतं. प्रतिकूल वातावरणामुळे विमान क्रॅश झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या विमान दुर्घटनेची चौकशी सुरु झाली असून, लँडिंगवेळी लागलेल्या आगीला नक्की कोणती गोष्ट जबाबदार आहे, याचं कारण शोधलं जात आहे.

विमानातील 49 पैकी बहुतेक प्रवासी सुदानमधील, तर दोन प्रवाशी परदेशातील होते. यूएनच्या शांती सैनिकांनी बचावकार्यात मोठी मदत केली.

दुर्घटनेचा व्हि़डीओ :

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV