मस्कतमधील 200 वर्ष जुन्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते अभिषेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओमानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेथील 200 वर्ष जुन्या शिवमंदिराचं दर्शनही घेतलं.

मस्कतमधील 200 वर्ष जुन्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते अभिषेक

मस्कत (ओमान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओमानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ओमानची राजधानी मस्कतमध्ये असलेल्या शिव मंदिराचं त्यांनी दर्शन देखील घेतलं.

पंतप्रधान मोदींनी ज्या शिव मंदिरात पूजा केली त्या मंदिरात शिवलिंगाशिवाय हनुमानाचीही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे मंदिर 200 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे. हे मंदिर ओमानच्या सुल्तानच्या महालाशेजारीच आहे. या मंदिराला मोतीश्वर मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. हे शिवमंदीर आखाती देशामध्ये बरंच प्रसिद्ध आहे.

दरम्यान, या मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेकही करण्यात आला. या मंदिराला भेट देण्यापूर्वी मोदींनी ओमानमधील उद्योजकांचीही भेट घेतली. दोन्ही देशातील व्यापारी संबंधावर यावेळी चर्चा करण्यात आली. चार अरब देशांच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pm modi in shiva temple in muscat latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV