पंतप्रधान मोदींचं जगातील सर्वात सुरक्षित हॉटेलमध्ये वास्तव्य

By: | Last Updated: > Wednesday, 5 July 2017 1:10 PM
PM Narendra Modi staying in world’s most secure suite

जेरुसलेम : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्त्रायल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींचं वास्तव्य जेरुसलेमच्या किंग डेव्हिड हॉटेलमध्ये आहे. हे हॉटेल चालवणाऱ्यांच्या मते, भारतीय पंतप्रधान सध्या जगाची पर्वा न करता, काळजी न करता इथे बिनधास्त राहू शकतात. कारण पंतप्रधान हॉटेलच्या ज्या रुममध्ये राहत आहे, ती पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित हॉटेल स्वीट आहे.

किंग डेव्हिड हॉटेलचे संचालक शेल्डन रिट्ज म्हणाले की, मोदींच्या रुमवर कोणत्याही प्रकारचा बॉम्ब किंवा केमिकल हल्ल्याचा परिणाम होऊ शकत नाही.

रिट्ज म्हणाले की, “जर हॉटेल बॉम्बने उडवलं तरी त्यांच्या रुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. नरेंद्र मोदी आणि भारताच्या प्रतिनिधीमंडळाच्या वास्तव्यासाठी हॉटेलच्या 110 रुम रिकाम्या केल्या आहेत.”

“आम्ही या शतकातील प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचं स्वागत केलं. क्लिंटन, ओबामांपासून काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांचंही स्वागत केलं आहे. आता आम्ही मिस्टर मोदी यांचं यजमानपद भूषवत आहोत,” असं रिट्ज यांनी सांगितलं.

शेल्डन रिट्ज यांच्या माहितीनुसार, “मोदी शाकाहारी असल्याने, त्यांच्या स्वीटमध्ये ठेवलेले कूकीजही एगलेस आणि शुगरफ्री असल्याची काळजी हॉटेलने घेतली आहे. इतकंच नाही तर रुममधील फुलंही भारतीय प्रतिनिधीमंडळाच्या आवडीची असावीत याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या रुमबाबत बोलायचं झाल्यास त्यात स्वतंत्र किचन आहे. मोदींनी जर एखाद्या पदार्थाची फर्माईश केली, तर तो पदार्थ सहजरित्या बनवता येईल. किचनची जबाबदारी रीना पुष्कर्ण यांच्याकडे असून मोदींच्या आवडीनुसारच पदार्थ बनवले जात आहेत.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:PM Narendra Modi staying in world’s most secure suite
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका

नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश
सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं

रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली : रशियाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7

तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान
तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान

लॉस अँजेलस : सेल्फी घेण्याचा मोह आजकाल प्रत्येक वयोगटातील

फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'
फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'

लंडन : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका फेटाळली
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका...

इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया

प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

वॉशिग्टंन : गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत ‘फील्ड्स मेडल’

यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतीसुमने
यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प...

वॉशिंग्टन : अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या

पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू
पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू