ऑनलाईन ट्रोल झालेल्या पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू

'जी तरुणी उद्या माझ्याऐवजी पॉर्न व्हिडिओसाठी शूट करणार आहे, तिने लक्षात ठेवावं, की तुमच्या सहअभिनेत्याने गे पॉर्नसाठी शूटिंग केलं आहे.' असं ट्वीट पॉर्नस्टार ऑगस्ट एम्सने केलं होतं

ऑनलाईन ट्रोल झालेल्या पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू

न्यू यॉर्क : ऑनलाईन ट्रोल झालेली 23 वर्षीय पॉर्नस्टार मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ऑगस्ट एम्सने गे पॉर्नस्टार्सविषयी कमेंट केल्यानंतर ती समलैंगिकविरोधी (होमोफोबिक) असल्याची टीका झाली होती. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा संशय बळावला आहे.

ऑगस्ट एम्स 270 पेक्षा अधिक ट्रिपल एक्स रेटेड व्हिडिओजमध्ये झळकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने महिला पॉर्नस्टार्सना उद्देशून एक ट्वीट केला होता. 'जी तरुणी उद्या माझ्याऐवजी पॉर्न व्हिडिओसाठी शूट करणार आहे, तिने लक्षात ठेवावं, की तुमच्या सहअभिनेत्याने गे पॉर्नसाठी शूटिंग केलं आहे. फक्त तुमच्या माहितीसाठी.'

August Ames Porn star 2

यानंतर तिने 'मी होमोफोबिक नाही' असं ट्वीट केलं. 'सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश मुली गे पॉर्नमध्ये काम केलेल्या मुलांसोबत शूटिंग करत नाहीत. म्हणून हा सल्ला दिला' असंही तिने स्पष्ट केलं.

https://twitter.com/AugustAmesxxx/status/937422512077471744
'गे पॉर्नमध्ये काम करणारे अभिनेते वैयक्तिक आयुष्यात काय करतात, मला माहित नाही. मी माझं शरीर धोक्यात टाकू शकत नाही.' असं स्पष्टीकरण तिने दिलं होतं. मात्र ऑगस्ट होमोफोबिक म्हणजेच समलैंगिक समुदायाच्या विरोधात असल्याची टीका झाली होती.

'माझं गे कम्युनिटीवरही प्रेम आहे. माझा उद्देश वाईट नव्हता' असंही तिने नंतर स्पष्ट केलं. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर ऑगस्टला ट्रोल करण्यात आलं होतं.

चार वर्षांपूर्वी ऑगस्ट एम्सने पॉर्न इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. तिने दोन अॅडल्ट व्हिडिओ न्यूज पुरस्कारही पटकावले होते.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Porn star August Ames in suspected suicide after being trolled online latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV