VIDEO : ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्रेग्नंट बियोन्सच्या परफॉर्मन्सने सगळेच अवाक्

VIDEO : ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्रेग्नंट बियोन्सच्या परफॉर्मन्सने सगळेच अवाक्

लॉस एन्जेलिस : अमेरिकन पॉपस्टार बियोन्सला बेस्ट अर्बन कन्टेम्पररी अल्बमसाठी प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आला. लॉस एन्जेलिसमध्ये पार पडलेल्या 59 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात प्रेग्नंट बियोन्सच्या परफॉर्मन्समुळे तिथे उपस्थित सगळेच अवाक् झाले.

बियोन्सने 12 दिवसांपूर्वी आम्हाला जुळी मुलं होणार असल्याचं सांगत प्रेग्नन्सीची बातमी जाहीर केली होती. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कारांच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमामध्ये दिसली.

चमचमणारा गोल्डन गाऊन परिधान केलेल्या प्रेग्नंट बियोन्सने 'लेमोनेड' अल्बममधील 'लव ड्राऊट' आणि 'सॅण्डकॅस्ट्ल' या गाण्यावर परफॉर्म करुन सोहळ्याला चारचांद लावले.

35 वर्षीय बियोन्सला ग्रॅमीच्या नऊ विभागांमध्ये नामांकन मिळालं होतं.

परफॉर्मन्स झाल्यानंतर एक तासाने तिचा फोटो ऑनलाईन जारी झाला. या फोटोला 24.3 लाख लाईक मिळाले तर 166,000 कमेंट्स मिळाल्या.

पाहा व्हिडीओ

ART AND LITERATURE शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV