भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 9 August 2017 9:19 PM
Qatar offers visa-free entry to 80 countries including India latest update

दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश जाहीर केला आहे. शेजारी आखाती राष्ट्रांनी टाकलेल्या दोन महिन्यांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर कतार सरकारने हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे. 33 देशातील नागरिकांना 180 दिवस (सहा महिने) तर उर्वरित 47 देशातील नागरिकांना 30 दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल. सुरक्षा आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरुन ही विभागणी करण्यात आली आहे.

सौदी अरेबिया, इजिप्त, बहारेन आणि यूएईने 5 जून रोजी कतारवर बहिष्कार लादला होता. इराणशी जवळीक साधल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत कतारशी या देशांनी वाहतुकीचे संबंध तोडले.

या निर्णयामुळे कतार अत्यंत मुक्त देश म्हणून गणला जाईल, असा विश्वास कतार टुरिझम ऑथरिटीचे प्रमुख पर्यटन विकास अधिकारी हसन अल इब्राहिम यांनी व्यक्त केला. दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी कतारने हा निर्णय घेतला आहे. कतार 2022 मध्ये होणाऱ्या सॉकर वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवणार आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Qatar offers visa-free entry to 80 countries including India latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य...

दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन

भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू
भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू

लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी

चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!
चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!

पेइचिंग : चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची

दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार
दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार

लंडन : दक्षिण युरोपातील नागरिकांना सध्या भीषण तापमानाचा सामना

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी
पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या...

मुंबई: मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यसह

तब्बल 20 वर्षांनंतर पाकिस्तान सरकारमध्ये हिंदू मंत्री!
तब्बल 20 वर्षांनंतर पाकिस्तान सरकारमध्ये हिंदू मंत्री!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या