काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरात रॉकेट कोसळलं

काबूलमध्ये भारतीय राजदुताच्या घरात रॉकेट कोसळलं

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय राजदूत मनप्रीत वोहरा यांच्या घरात रॉकेट कोसळलं. मनप्रीत वोहरा यांच्या घराच्या टेनिस कोर्टमध्ये रॉकेट कोसळलं.

आज सकाळी 11.15 वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, कोणत्याही भारतीयाला दुखापत झालेली नाही.

हा अपघात होता की घातपात?,  जर घातपात असेल तर कोणी घडवला हे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काबूल शहर हायअलर्टवर असताना ही घटना घडली.

याआधी 31 मे रोजी काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात 150 जणांचा मृत्यू झाला होता, तर 325 पेक्षा जास्त जखमी झाले होते. त्यावेळीही भारतीय दुतावासाचे सर्व कर्मचारी सुदैवाने सुरक्षित होते.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV