306 मीटर उंचीच्या इमारतीला लटकून मॉडेलचं फोटोशूट

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 17 February 2017 4:37 PM
306 मीटर उंचीच्या इमारतीला लटकून मॉडेलचं फोटोशूट

दुबई : हा फोटो पाहिला तर कोणाही सामान्य माणसाच्या हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहणार नाही. रशियाच्या विकी ओडिंटकोवा या सुपरमॉडेलचं फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

विकी ओडिंटकोवा दुबईतील एका गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर, कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवाय लटकताना दिसत आहे. विशेष म्हणजे फोटोशूटसाठी तिने हा स्टंट केला आहे. आता तिच्या फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं वेगळं सांगायला नको.

From reality Ph: @a_mavrin #MAVRIN #MAVRINmodels #VikiOdintcova @sashatikhomirov #Dubai

A post shared by Viki Odintcova (@viki_odintcova) on

 

गगनचुंबी इमारतीला लटकलेल्या विकीच्या एका फोटोलाच आतापर्यंत 99,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

दुबईच्या सायान टॉवरला लटकलेल्या विकीने आधार म्हणून या व्हिडीओचा दिग्दर्शक अलेक्झांडर तिखोमिरोव याचा हात पडकला होता. 70 मजल्यांच्या सायान टॉवरची उंची 1000 फुटांपेक्षा (306 मीटर) जास्त आहे.

Model_2

श्वास थांबायला लावणारा हा फोटो विकी ओडिंटकोवाने 29 डिसेंबर 2016 रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 32 लाखांपेक्षा जास्त आहे.

एकीकडे या खतरनाक फोटोबाबत विकी ओडिंटकोवाचं कौतुक होत असताना दुसरीकडे स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याने टीकाही होत आहे. तरीही तिने 3 फेब्रुवारी रोजी या फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट केला.

 

Full video (link in bio)! @a_mavrin #MAVRINmodels #MAVRIN #VikiOdintcova #Dubai

A post shared by Viki Odintcova (@viki_odintcova) on

 

या व्हिडीओला पण आतापर्यंत 51000 पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर 4.2 लाखांपेक्षा जास्त वेळा व्हिडीओ पाहिला आहे.

याशिवाय विकीने एक ‘बिहाईंड द सीन्स’ व्हिडीओ 30 डिसेंबरला पोस्ट केला होता, जो आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. त्यानंतर विकी ओडिंटकोवा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

 

First Published: Friday, 17 February 2017 4:14 PM

Related Stories

अल्ट्रामॅन मिलिंद सोमण, 517 किमीची स्पर्धा अनवाणी पूर्ण
अल्ट्रामॅन मिलिंद सोमण, 517 किमीची स्पर्धा अनवाणी पूर्ण

ओरलँडो/मुंबई : एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने गेल्या

भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा
भरकटलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला जर्मन एअरफोर्सनं दाखवली दिशा

मुंबई: मुंबईहून लंडनकडे जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा ATC शी (Air Traffic

सातासमुद्रापार शिवरायांचा जयघोष, न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी
सातासमुद्रापार शिवरायांचा जयघोष, न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी

न्यूयॉर्क : अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेयर परिसर ‘जय

हाफिज सईद दहशतवाद्यांच्या यादीत, पाकिस्तानच्या पंजाब सरकारची कारवाई
हाफिज सईद दहशतवाद्यांच्या यादीत, पाकिस्तानच्या पंजाब सरकारची...

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं मुंबई 26/11 हल्ल्याचा

गिरकी घेणारी गगनचुंबी इमारत, दुबईत अनोखा आविष्कार
गिरकी घेणारी गगनचुंबी इमारत, दुबईत अनोखा आविष्कार

दुबई : आकाशात उडणारे पक्षी, मासे यांना स्वतःभोवती गिरकी घेताना

एअर इंडियाचं अंकारात इमर्जन्सी लँडिग, 250 भारतीय प्रवासी अडकले
एअर इंडियाचं अंकारात इमर्जन्सी लँडिग, 250 भारतीय प्रवासी अडकले

अंकारा : एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमानाचं तुर्कस्तानची राजधानी

पैज हरल्याने टेनिसस्टार युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यासोबत डेटवर!
पैज हरल्याने टेनिसस्टार युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यासोबत...

मुंबई: कोणत्याही खेळाबाबतची भविष्यवाणी कधी पथ्यावर पडेल, तर कधी

पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, 100 जणांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, 100 जणांचा मृत्यू

कराची: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका आत्मघातकी हल्लेखोरांनं

गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र
गुगल बॉस, मला नोकरी करायची आहे, पिचाईंना चिमुरडीचं पत्र

न्यूयॉर्क : लहानपणी डॉक्टर, इंजिनिअरपासून पायलट, एअर हॉस्टेसपर्यंत

भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!
भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!

मुंबई : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला भारतीयांकडून हनिमून